
जम्मू (जम्मू-काश्मीर) – हिंदूंसाठी अत्यंत पवित्र आणि श्रद्धेचे प्रतीक असलेल्या अमरनाथ यात्रेसाठी भाविकांचा पहिला चमू २ जुलैला जम्मूहून मार्गस्थ झाला. जम्मू-काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी हिरवा झेंडा दाखवल्यानंतर यात्रेला प्रारंभ झाला. ३८ दिवसांची ही यात्रा पहलगाम आणि बालटाल या दोन्ही मार्गांवरून जाईल. रक्षाबंधन, म्हणजेच ९ ऑगस्टला ही यात्रा संपेल.
गेल्या वर्षी ५ लाख भाविकांनी अमरनाथ येथील पवित्र गुहेचे दर्शन घेतले होते. यंदाही अद्यापपर्यंत साडेतीन लाखांहून अधिक यात्रेकरूंनी नोंदणी केली आहे. तात्काळ नोंदणीचीही व्यवस्था जम्मूमधील सरस्वती धाम, वैष्णवी धाम, पंचायत भवन आणि महाजन सभा येथे करण्यात आली आहे. प्रत्येक केंद्रावर २ सहस्र भाविकांची नोंद केली जाऊ शकते.
न्यायाधिशांच्या खुर्चीवर काळी जादू करणार्या महिलेला अटक
थुंकणार्याकडून आता अडीच सहस्र रुपये दंड वसूल करा ! – मुंबई उच्च न्यायालय
शिवराज मोटेगावकर याने रसायनशास्त्राची प्रश्नपत्रिका मिळवण्यासाठी दिले ५ लाख रुपये !
Rohingya Sink : रोहिंग्या निर्वासितांच्या २ नौका बुडाल्याने ५०० हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याची भीती
Puri Rath Yatra Stampede : पुरी रथयात्रेत चेंगराचेंगरी : एकाचा मृत्यू, तर १०० हून अधिक भाविक घायाळ
इस्लामिक स्टेटला साहाय्य करणारा राकिब अंसारी याला ५ वर्षांच्या कारावासाची शिक्षा