(बुरखा म्हणजे संपूर्ण शरीर झाकण्याचे वस्त्र)

अस्ताना – कझाकस्तानमध्ये नुकत्याच संमत झालेल्या एका नवीन कायद्यानुसार, महिला सार्वजनिक ठिकाणी बुरखा किंवा चेहरा झाकणारे कापड घालू शकणार नाहीत. कझाकस्तानचे राष्ट्रपती कासिम-जोमार्ट तोकायेव यांनी नुकतीच या कायद्यावर स्वाक्षरी केली. हा कायदा सार्वजनिक ठिकाणी कुणालाही चेहरा झाकण्यास मनाई करतो. या देशातील ७० टक्के लोक इस्लामनुसार आचरण करत असूनही येथे असा निर्णय घेण्यात आला आहे.
१. कझाकस्तानचे राष्ट्रपती तोकायेव यांनी म्हटले आहे की, चेहरा लपवणारे कपडे घालण्याऐवजी राष्ट्रीय शैलीचे कपडे घालणे चांगले. तोकायेव यांनी देशाची धर्मनिरपेक्षता प्रतिमा राखण्यावरही भर दिला आहे.
२. यापूर्वी वर्ष २०२३ मध्ये कझाकस्तान सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला होता आणि शाळांमध्ये हिजाब (मुसलमान महिलांचे डोके आणि मान झाकण्याचे वस्त्र) आणि नकाब (चेहरा झाकण्याचे जाळी असलेले वस्त्र) यांवर बंदी घातली होती.
मध्य आशियातील अनेक मुसलमान देशांकडून बुरख्यावर बंदी !मध्य आशियाई देशांनी अलीकडच्या काळात बुरख्यावर बंदी घालणारे कायदे केले आहेत. किर्गिस्तानमध्ये बुरखा घालण्यास बंदी आहे. उझबेकिस्तानमध्ये बुरखा घालणार्या महिलांना दंड आकारण्याची तरतूद करण्यात आली आहे. ताजिकिस्तानचे अध्यक्ष इमोमाली रखमोन यांनी सार्वजनिक ठिकाणी चेहरा झाकणारे कपडे घालण्यास बंदी घातली आहे. |
संपादकीय भूमिकाअसे भारतात करण्याचा प्रयत्न जरी केला, तरी धर्मांध मुसलमानांपासून त्यांचा लाळघोटेपणा करणार्या काँग्रेसपर्यंत सर्व एकजात आकाश-पाताळ एक करतील ! |
Pune Love-Jihad : हिंदु तरुणीला प्रेमजाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करत सुफियान खान याच्याकडून मानसिक छळ !
HJS Demand : कुणाल कामरा आणि प्रकाश राज यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवा !
Aamir Khan Gets Death Threat : अभिनेते आमिर खान यांना ‘लव्ह जिहाद’वरून लॉरेन्स बिश्नोई टोळीकडून ठार मारण्याची धमकी
Hormuz Oil Tankers Explodes : हॉर्मुझमध्ये २ तेल टँकर नौकांमध्ये स्फोट
सुनेचे सातत्याने लैंगिक शोषण करणारा सासरा झाकीर याच्या गुप्तांगावर सुनेने धारदार शस्त्रांनी केले आक्रमण
Bullet Train Project : बुलेट ट्रेन प्रकल्पाला विलंब होण्यास भारतीय मंत्र्याचे वर्तन उत्तरदायी