दोन शिक्षकांवर गुन्हा नोंद !

बीड – येथील उमाकिरण नावाच्या खासगी शिकवणीमध्ये शिकणार्या १७ वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनीचा वर्षभर सातत्याने लैंगिक छळ केल्याच्या प्रकरणी विजय पवार आणि प्रशांत खाटोकर या शिक्षकांच्या विरोधात बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात ‘पोक्सो’ कायद्याच्या अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस अधिक अन्वेषण करत असून दोन्ही शिक्षक पसार झाले आहे. या प्रकरणाच्या निषेधार्थ बीडमधील सर्व खासगी शिकवणीवर्ग बंद ठेवण्यात आले आहेत. (केंद्र आणि राज्य सरकार यांनी अल्पवयीन मुलींच्या अधिकारासाठी कठोरात कठोर कायदे केले आहेत; मात्र यानंतरही वाढत्या गुन्ह्यांची संख्या पहाता हे कायदे केवळ कागदावर आहेत, असेच दुर्दैवाने म्हणावे लागेल. लैंगिक अत्याचार, छळ करणार्यांना तात्काळ आणि कठोर शिक्षा होत नसल्याने असे प्रकार वाढत आहेत. कठोर कायद्याच्या कार्यवाहीच्या समवेत मुली-युवती यांना धर्मशिक्षण आणि स्वरक्षण प्रशिक्षणही देणे अत्यावश्यक आहे ! – संपादक)
१. विद्यार्थिनीने सांगितले की, शिक्षक प्रशांत खोटोकर आणि विजय पवार हे दोघेही विद्यार्थिनीला शिकवणी संपल्यावर त्यांच्या कार्यालयात बोलावून बळजोरीने अश्लील वर्तन करायचे. तिच्या शरिराच्या विविध अंगाला स्पर्श करून संपूर्ण अंगावरील कपडे काढून तिची नग्न छायाचित्रे काढायचे. असे प्रकार तिच्यासमवेत वारंवार करत असत. या संदर्भात ‘घरी सांगितले, तर तुला मारून टाकेन’, अशी धमकी दिली होती. या प्रकरणामुळे ही विद्यार्थिनी मानसिक तणावाखाली गेली होती. पालकांनी विद्यार्थिनीस विश्वासात घेत विचारणा केली असता तिने ही सर्व माहिती दिली.
२. या घटनेची राज्य महिला आयोगाने नोंद घेतली असून आरोपी निश्चित होईपर्यंत शिकवणीवर्गाची इमारत बंद ठेवावी, ‘सीसीटीव्ही फुटेज’ कह्यात घ्यावे, इतर काही विद्यार्थिनींच्या तक्रारी असतील, तर त्या नोंदवाव्यात, असे निर्देश राज्य महिला आयोगाने दिले आहे. या संदर्भात अन्वेषण करून त्याचा अहवाल तात्काळ विभागास द्यावा, असेही आयोगाने म्हटले आहे.
३. या घटनेच्या निषेधार्थ बीडमधील सर्व शिकवणीवर्ग बंद ठेवण्यात आले असून सर्व खासगी शिकवणीवर्गांच्या परिसरात पोलिसांचा अतिरिक्त बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
| बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांची ९ डिसेंबर २०२४ या दिवशी हत्या करण्यात आली होती. हे प्रकरण शांत होते ना होतेच लैंगिक अत्याचाराचे नवीन प्रकरण बीडमध्येच उघडकीस आले आहे. |
आरोपी शाहिना रफिक हिला पुण्यात अन्वेषणासाठी बोलावले
Corporate Jihad SUD Life Insurance : विमा आस्थापनेतील मुसलमान व्यवस्थापकाकडून हिंदु तरुणीचा छळ !
बेंगळुरूमध्ये कचरा वेचणार्या सैबुलने विद्यार्थिनीवर केला बलात्काराचा प्रयत्न !
पान मसाला, गुटखा आणि भेसळीचे अन्नपदार्थ यांचा दीड कोटीहून अधिक किमतीचा साठा जप्त
Shivakumar As Lord Shiva : कन्नड दैनिक ‘विश्ववाणी’ने डी.के. शिवकुमार यांना भगवान शिवाच्या रूपात दाखवले !
Gujrat Crackdown Illegals Bangladeshi : गुजरातमध्ये घुसखोरांविरुद्ध ‘ऑपरेशन डेल्टा हंट’ : २ दिवसांत ५०१ बांगलादेशी नागरिकांना अटक !