डॉ. डेव्हिड फ्रॉली यांच्या ‘योगा बियॉन्ड बॉडी अँड माइंड’ पुस्तकाचे प्रकाशन

नवी देहली – प्रख्यात वैदिक संशोधक आणि जागतिक स्तरावर भारतीय तत्त्वज्ञानाचे अभ्यासक डॉ. डेव्हिड फ्रॉली (वामदेव शास्त्री) यांनी त्यांचे नवीन पुस्तक ‘योगा बियॉन्ड बॉडी अँड माइंड’ (शरीर आणि मन यांच्या पलीकडे योग) प्रकाशित केले आहे. हे पुस्तक प्रतिष्ठित मोतीलाल बनारसीदास प्रकाशन संस्थेने प्रसिद्ध केले आहे. या गंभीर आणि चिंतनशील ग्रंथात डॉ. फ्रॉली यांनी आधुनिक काळातील शारीरिक योगाभ्यासाच्या मर्यादेपलीकडे जाऊन योगाच्या आध्यात्मिक, मानसशास्त्रीय आणि तत्त्वज्ञानात्मक पैलूंवर सखोल प्रकाश टाकला आहे. त्यांनी ‘योग हा केवळ आरोग्यासाठीचा व्यायाम आहे’, हा पाश्चात्त्यांचा भ्रामक समज मोडित काढला असून, योग ही सनातन धर्मामध्ये मूळ असलेली स्वस्वरूपाची ओळख करून देणारी एक उन्नत साधना असल्याचे ठासून सांगितले आहे.

१. योग केवळ शरीरसंपादन अथवा मानसिक शांती यांसाठी नाही, तर शरीर आणि मन यांच्यावर ताबा मिळवून आत्मानुभूतीकडे नेणारा मार्ग आहे, असे त्यांनी पुस्तकातून स्पष्ट केले आहे. योग शरीर आणि मन यांच्यापासून चालू होतो; परंतु त्याच्यापलीकडे असलेल्या आत्म्यापर्यंत नेतो, असे त्यांनी पुस्तकात नमूद केले आहे.
२. या पुस्तकात प्राणायाम, मंत्र, ध्यान आणि अद्वैत वेदांत यांसारख्या संबंधित धार्मिक साधनांचेही विवरण आहे, जे वाचकाला अंतर्मुखतेचा संपूर्ण आणि आध्यात्मिक दृष्टिकोन देतात.
३. जगभरातील योगसाधक, संशोधक आणि अध्यात्मविषयक जिज्ञासू यांनी या पुस्तकाचे कौतुक केले आहे. ‘योगाचे सनातन स्वरूप समजून घेण्याची इच्छा असलेल्या प्रत्येकाने हे पुस्तक वाचावे’, असे त्यांचे म्हणणे आहे.
हिंदूविरोधी ‘देवस्थान इनाम जमीन निर्मूलन अधिनियम’ रहित करावा !
Monsoon Reached Keralam : मौसमी पावसाचे केरळम्मध्ये आगमन !
‘हाफकीन’ आणि घाना सरकार यांच्यात सर्पदंशावरील उपचारपद्धतीसह अन्य संशोधनासाठी सहकार्य करार होणार !
आरोपी शाहिना रफिक हिला पुण्यात अन्वेषणासाठी बोलावले
तुमकुरू (कर्नाटक) येथे श्रीराममंदिराच्या शेजारी अल्पसंख्यांकांचे वसतीगृह बांधण्याचा डाव !