पुणे – २१ जून हा दिवस ‘जागतिक योग दिन’ म्हणून साजरा केला जातो. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पालख्या जागतिक योग दिनाच्या दिवशी पुण्यात मुक्कामी असणार आहेत.
त्यामुळे राज्यशासनाच्या पुढाकाराने येथे ‘वारकरी भक्तीयोग उपक्रमा’चे आयोजन केले आहे, अशी माहिती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठाचे कुलगुरु डॉ. सुरेश गोसावी आणि विद्यापिठाच्या सल्लागार समितीचे सदस्य राजेश पांडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
राजेश पांडे म्हणाले,

१. मुख्य कार्यक्रम पुणे विद्यापिठाच्या सभागृहामध्ये सकाळी ८ वाजता होईल.
२. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार, तसेच उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत वारकरी, विद्यार्थी, सामाजिक अन् राजकीय क्षेत्रांतील नागरिक योगासने करणार आहेत.
३. महाराष्ट्र सरकार, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे महापालिका, राष्ट्रीय सेवा योजना, श्रीक्षेत्र आळंदी, श्रीक्षेत्र देहू, विद्यार्थी विकास मंच यांनी एकत्रितपणे या उपक्रमाचे आयोजन केले आहे.
४. या उपक्रमात १० लाख नागरिक सहभागी होतील. शहरातील २०० हून अधिक महाविद्यालये, २५ विद्यापिठे, विविध सामाजिक संस्था, राजकीय पक्ष आणि गणेश मंडळाचे कार्यकर्ते यात सहभागी होणार आहेत.
५. उपक्रमात सहभागी होण्यासाठी विद्यार्थी कल्याण अधिकारी, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम आधिकारी, विद्यार्थी आणि स्वयंसेवक यांनी नोंदणी करण्यास सांगण्यात आले आहे.
Three Language Policy : इंग्रजी भारताचीच स्थानिक भाषा मानली जाऊ शकते का ? – सर्वाेच्च न्यायालयाचा प्रश्न
Karnataka AI University : बेंगळुरूत देशातील पहिले ‘एआय’ विद्यापीठ चालू करणार !
Telangana AI Training : तेलंगाणातील काँग्रेस सरकार ८० सहस्र अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांना एआय आणि डिजिटल सुरक्षा यांचे विनामूल्य प्रशिक्षण देणार !
डहाणू (जिल्हा पालघर) येथे होणार जगातील सर्वांत मोठ्या कृषी बाजाराची उभारणी !
थोडक्यात महत्त्वाचे (दि : १५.०७.२०२६)
कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मीदेवी मंदिरात पाण्याची गळती !