
मुंबई – एस्.टी.च्या समवेत संयुक्तपणे धार्मिक स्थळांच्या भेटीचे आयोजन करावे, अशी नाविन्यपूर्ण संकल्पना राबवण्याचे आवाहन परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी खासगी टूर्स अँड ट्रॅव्हल्स आस्थापनांना केले आहे. यामुळे सर्वसामान्य प्रवाशांना अल्प व्ययात निवास आणि भोजन व्यवस्थेसह धार्मिक पर्यटनाचा आनंद घेता येईल, असे प्रताप सरनाईक यांनी म्हटले आहे. या अनुषंगाने १६ जून या दिवशी एस्.टी. महामंडळाच्या मुख्यालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीला एस्.टी. महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर यांसह सर्व खातेप्रमुख अन् खासगी टूर्स अँड ट्रॅव्हल्स आस्थापनांचे प्रतििनधीही उपस्थित होते.
या वेळी प्रताप सरनाईक म्हणाले, ‘‘भाविक पर्यटकांच्या मागणीनुसार अष्टविनायक दर्शन, तुळजापूर-पंढरपूर-अक्कलकोट दर्शन, ज्योतिर्लिंग दर्शन, त्रंबकेश्वर-नाशिक दर्शन अशा धार्मिक सहलींचे आयोजन करता येईल. या उपक्रमाचा प्रारंभ येत्या श्रावण महिन्यापासून करण्यात यावा. अशी योजना राबवल्यास तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी पर्यटकांना जेथे उपलब्ध असेल, तेथे स्वच्छतागृह आणि निवास व्यवस्था निःशुल्क उपलब्ध करून देण्यात येईल. अल्प गर्दीच्या काळात विशेषतः सुट्ट्यांच्या दिवशी एस्.टी.ला प्रवासी भारमान अल्प असते. त्यामुळे उत्पन्न अल्प मिळते. या काळात खासगी टूर्स अँड ट्रॅव्हल्सच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेसाठी धार्मिक पर्यटनस्थळी सहली आयोजित केल्यास त्यातून एस्.टी. महामंडळाचे उत्पन्न वाढेल, तसेच सर्वसामान्य प्रवाशांना अल्पदरात पर्यटनचा आनंद लुटता येईल.’’
कोल्हापूर आगारात ‘ई-शिवाई’ इलेक्ट्रिक बसचे लोकार्पण उत्साहात !
Mumbai Hub Of Bangladeshi Infiltrators : मुंबई बांगलादेशी घुसखारांचे केंद्र : १ सहस्र ५०० हून अधिक ठिकाणी घुसखोरांचे अड्डे !
आरे परिसरातील ८० एकर जागेत ५ लाख वृक्षारोपण मोहिमेचा शुभारंभ !
गडचिरोलीतील खाण प्रकल्प रहित करावेत ! – आदित्य ठाकरे, नेते, ठाकरे गट
विधान परिषदेमध्ये महायुतीचे ५ उमेदवार बिनविरोध विजयी !
बसस्थानके आणि बसगाड्या यांची प्रत्येक ४ घंट्यांनी स्वच्छता होणार ! – परिवहनमंत्री