कर्णावती विमान अपघाताच्या प्रकरणी तुर्कीयेकडून स्पष्टीकरण
अंकारा (तुर्कीये) – कर्णावती येथे झालेल्या विमान अपघातामागे घातपात असून तो तुर्कीयेच्या ‘तुर्की टेक्निक’ आस्थापनाकडून करण्यात आल्याचा आरोप काही जणांकडून केला जात आहे. योगऋषी रामदेवबाबा यांनीही या विमानाची देखभाल तुर्कीयेच्या आस्थापनाने केल्याचे सांगून तुर्कीयेच्या सहभागाची चौकशी करण्याची मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर आता तुर्कीयेच्या माहिती विभागाने स्पष्टीकरण देत ‘आमच्या देशाचे आस्थापन या विमानाची देखभाल करत नव्हते’, असे म्हटले आहे.
"The crashed aircraft was not maintained by our establishment!" – Turkiye clarifies regarding the Ahmedabad plane crash incident pic.twitter.com/PSHsNSWlt6
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) June 15, 2025
भारत-तुर्कीये संबंध खराब करण्याचा प्रयत्न !
‘एक्स’वर पोस्ट करतांना माहिती विभागाने म्हटले आहे की, एअर इंडिया आणि ‘तुर्की टेक्निक’ यांच्यातील करार केवळ ‘बी ७७७’ विमानांच्या देखभालीसाठी आहे, ‘बोईंग ७८७-८’ साठी नाही. तुर्की टेक्निकने कधीही अपघातग्रस्त विमानाच्या देखभालीचे काम केलेले नाही. आतापर्यंत तुर्की टेक्निकने एअर इंडियाच्या कोणत्याही बोईंग ७८७-८ विमानांची दुरुस्ती केलेली नाही. आम्हाला ठाऊक आहे की, कोणत्या आस्थापनाने त्या विमानाची शेवटची सेवा केली होती; परंतु गैरसमज पसरू नयेत; म्हणून आम्ही त्याविषयी काहीही सांगू शकत नाही. या अपघातामागे आमचे आस्थापन असल्याचा दावा करणे, म्हणजे जनतेची दिशाभूल करण्याचा आणि भारत-तुर्कीये संबंध खराब करण्याचा प्रयत्न आहे. आमची संस्था अशा खोट्या दाव्यांवर लक्ष ठेवेल आणि तुर्कीयेची प्रतिमा अपकीर्त करणार्यांवर आवश्यक कारवाई करेल.

संपादकीय : हिंदु राष्ट्राची चर्चा हवीच !
भारतातील ‘डेटा सेंटर्स’मुळे निर्माण होणारे जलसंकट !
सांगलीच्या अपघातग्रस्त वारकर्यांना पालकमंत्र्यांकडून ५ लाख रुपयांचे साहाय्य !
Maharashtra ATS Raid : आंतकवादविरोधी पथकाच्या पुणे-पिंपरी चिंचवडमध्ये २३ हून अधिक ठिकाणी धाडी !
UK Mandir Auction : ब्रिटनमध्ये लिलावात मंदिराची जागा मुसलमानांना विकली !
Iran US War : इराणचे हॉर्मुझमध्ये तेलवाहू नौकेवर आक्रमण : १ भारतीय ठार