
वॉशिंग्टन : आम्ही काश्मीर प्रश्न निकालात काढू, असे विधान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांनी व्हाईट हाऊस येथे आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात केले. या संदर्भातील वृत्त दैनिक ‘बिझनेस स्टँडर्ड’ने प्रसारित केले आहे. यासह ट्रम्प यांनी पुन्हा एकदा दावा केला की, त्यांनी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संघर्ष टाळला. त्यांनी म्हटले की, मी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील युद्ध थांबवले आणि हे मी व्यापाराच्या माध्यमातून केले.
Donald Trump on Kashmir: "We’ll settle the Kashmir issue!"
It's quite laughable that the U.S., which struggles to solve its own internal problems like immigration, claims it can resolve Kashmir. India must assertively remind America that Kashmir is an internal matter, and the… pic.twitter.com/PelTezD2bH
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) June 13, 2025
भारताची भूमिका स्पष्ट !भारताने याआधीही अनेकदा काश्मीरसंदर्भातील भूमिका जगासमोर मांडलेली आहे. भारताने सातत्याने सांगितले आहे की, काश्मीरचे सूत्र हे द्विपक्षीय आहे. त्यामध्ये तिसर्या पक्षाच्या मध्यस्थीची आवश्यकता नाही. त्यामुळे भारताने तिसर्या देशाची कायमच मध्यस्थी नाकारलेली आहे आणि पाकिस्तानसमवेतची सर्व सूत्रे द्विपक्षीय मार्गाने सोडवली पाहिजेत, अशी भूमिका अनेकदा मांडली आहे. |
संपादकीय भूमिकास्वतःच्या देशातील स्थलांतरितांच्या प्रश्नासह अनेक प्रश्न निकाली काढू न शकणार्या अमेरिकेने काश्मीर प्रश्न निकालात काढू, असे म्हणणे हाच मोठा विनोद आहे. अर्थात् ‘काश्मीर हा भारताचा अंतर्गत प्रश्न असून त्यात अमेरिकेने नाक खुपसण्याची आवश्यकता नाही’, असे भारताने अमेरिकेला निक्षून सांगायला हवे ! |
Suhail Arrested : श्रीराममंदिर बाँबने उडवून देण्याचा कट रचणार्या सुहेल याला कर्नाटकमधून अटक
डेन्मार्क सरकार रस्त्यावर नमाजपठण आणि अजान यांवर बंदी घालण्याच्या विचारात !
पारपत्रावरून नागरिकत्व सिद्ध होत नाही ! : Central Goverment
Asim Munir Assassination Plan : इस्रायलची गुप्तचर यंत्रणा ‘मोसाद’ने रचला होता पाकचे सैन्यदलप्रमुख असीम मुनीर यांच्या हत्येचा कट !
बांगलादेशात गेल्या ५ महिन्यांत हिंदूंविरुद्ध ६४५ गुन्हे !
Venezuela Earthquake : १० सहस्र ते १ लाख लोकांच्या मृत्यूची शक्यता