त्रुटी उघड करणार्या कर्मचार्याचा झाला आहे संशयास्पद मृत्यू !

कर्णावती (गुजरात) : येथे एअर इंडियाचे ‘बोईंग ७८७ ड्रीमलाइनर’ विमान कोसळल्यानंतर या विमानातील तांत्रिक दोषांची माहिती समोर येऊ लागली आहे. इतिहासात पहिल्यांदाच अमेरिकेच्या बोईंग ७८७ ड्रीमलाइनर विमान अपघातग्रस्त झाले असेल, तरी यापूर्वी काही घटनांमध्ये अपघात होता होता टळला होता, अशी माहिती समोर आली आहे.
🚨Multiple technical faults found in aircraft of American company Boeing
🔴 In 2024, engineer Sam Salehpour revealed that faulty assembly in the 787 Dreamliner could cause it to break apart mid-air
🔴 In 2023, technician Richard Cuevas was fired after exposing poor production… pic.twitter.com/LjF8UFKCuL— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) June 13, 2025
१. ‘एरो इनसाइड’च्या वृत्तानुसार ड्रीमलाइनर विमानात इंजिन, गिअर, फ्लॅप, केबिन प्रेशरमध्ये अल्प आणि अधिक उंचीच्या संदर्भातील समस्या समोर आल्या आहेत. एअर इंडियाने बोईंग विमाने विकत घेतली असून त्यांचा वापर करत आहे. या वापराच्या वेळी एअर इंडियाला विमानातील या संदर्भातील अडचणी येत आहेत. १३ डिसेंबर २०२४ या दिवशी नवी देहलीहून बर्मिंगहॅमला (ब्रिटन) प्रवास करतांना एआय-११३ या विमानाच्या बर्मिंगहॅमच्या रनवे-१५ वर ‘नोज गिअर’मध्ये हायड्रोलिक समस्या निर्माण झाली होती.
२. एअर इंडियाच्या ड्रीमलायनर विमानाला १३६ समस्यांना तोंड द्यावे लागले. त्यामुळे एअर इंडियाला कोट्यवधी रुपयांची हानी झाली. या समस्या उद्भवल्यानंतर अमेरिकेतील ‘फेडरल एव्हिएशन ॲडमिनिस्ट्रेशन’ने बोईंगच्या ड्रीमलायनरची चौकशी चालू केली.
३. वर्ष २०१५ ते २०२४ या कालावधीत एअर इंडियाच्या ड्रीमलायनर विमानामध्ये अनेक समस्या आढळून आल्या. तांत्रिक अडचणींमुळे या अपघातात अनेक प्रवासी घायाळ झाले; मात्र कर्णावती येथील घटनेत मोठी जीवितहानी झाली.
बोईंग ७३७ विमानाचे झालेले अपघात२०२४ मध्ये दक्षिण कोरियामध्ये ‘बोईंग ७३७-८००’ विमान कोसळले, यामध्ये अनुमाने १८० जणांना जीव गमवावा लागला. जानेवारी २०२४ मध्ये बोईंग ७३७ मॅक्स विमानाच्या दरवाजाचे प्लग उडाले होते. वर्ष २०१८ आणि २०१९ च्या अपघातांमध्ये अनुक्रमे १८९ अन् १५७ जणांना जीव गमवावा लागला. असे असूनही बोईंग ७३७-८०० अजूनही कार्यरत आहे. |
४. मार्च २०१३ मध्ये जपान एअरलाइन्सच्या बोईंग ७८७ विमानात दोनदा इंधन गळतीची समस्या निर्माण झाली, त्यामुळे विमान उड्डाण करू शकले नाही. त्याचप्रमाणे युनायटेड एअरलाइन्सच्या बोईंग ७८७ विमानाच्या मुख्य बॅटरीमध्ये समस्या असल्याचे वृत्त आले. त्यानंतर जपान आणि अमेरिका या दोन्ही सरकारांनी बोईंग विमानांचे उड्डाण काही काळासाठी स्थगित केले.
५. भारतात एअर इंडियाला जोरदार वादळ असलेल्या भागात ड्रीमलायनरचे उड्डाण टाळण्याचा सल्ला बोईंग आस्थापनाने दिला होता; कारण यामुळे इंजिनवर बर्फ तयार होण्याचा धोका वाढतो. यामुळे देहली-टोकियो मार्गावरील विमानांचे उड्डाण थांबवावे लागले. एअर इंडियाचे देहली-कोलकाता ७८७ विमानाला जोरदार वार्यामुळे तडा गेल्याने ते देहलीला परतले होते.
♦ बोईंच्या माजी अभियंत्याने उघड केल्या होत्या समस्या
वर्ष २०२४ मध्ये बोईंग आस्थापनातील अभियंते सॅम सालेहपूर यांनी या विमानाच्या संरचनेविषयी प्रश्न उपस्थित केले होते. ते म्हणाले होते की, बोईंगने विमान बनवतांना काही ठिकाणी ‘शॉर्टकट’ अवलंबले गेले होते. ७८७ ड्रीमलायनर विमानाच्या ‘फ्यूजलेज’चे काही भाग चुकीच्या पद्धतीने एकत्र केले गेले होते. सहस्रो उड्डाणांनंतर ते हवेतच तुटू शकणारे होते. ♦ बोईंगने निकृष्ट दर्जाचे सुटे भाग वापरल्याचे सांगणार्या माजी कर्मचार्याचा संशयास्पद मृत्यू![]() बोईंगचे माजी कर्मचारी जॉन बार्नेट यांचा वर्ष २०१७ मध्ये संशयास्पदरित्या मृत्यू झाला होता. बार्नेट यांनी ३० वर्षे बोईंगमध्ये काम केले. त्यांच्या मृत्यूपूर्वी ते बोईंगच्या विरोधातील खटल्यात साक्ष देणारे एकमेव कर्मचारी होते. बार्नेट यांनी बीबीसीला सांगितले होते की, ७८७ ड्रीमलायनरच्या रचनेत बोईंगने निकृष्ट दर्जाचे सुटे भाग वापरले आहेत. विमाने वेळेवर सिद्ध करता यावीत; म्हणून कचर्याच्या डब्यातून निकृष्ट दर्जाचे सुटे भाग काढून विमानात बसवण्यात आले. विमान बांधण्याची घाई करत सुरक्षा मानकांशी तडजोड करण्यात आली. बांधणीची प्रक्रिया घाईघाईने करण्यात आली. आपत्कालीन ऑक्सिजन सिस्टीममध्येही बिघाड होता. या विमानांचे उड्डाण हे २५ टक्के निकामी ठरू शकते, असे त्यांनी आस्थापनाच्या व्यवस्थापकांसमोर मांडले होते; मात्र यावर कोणतीही कारवाई झाली नव्हती. बार्नेट यांनी केलेल्या दाव्यांनंतर त्यांना मोठ्या प्रमाणात विरोधाचा सामना करावा लागला होता. वर्ष २०२४ मध्ये त्यांचा रहस्यमयरित्या मृत्यू झाला. त्यानंतर त्यांच्या कुटुंबियांनी बोईंगसंबंधित मानसिक आघाताचा उल्लेख करून तिच्या विरोधात खटला प्रविष्ट (दाखल) केला. ‘यूएस् नॅशनल ट्रान्सपोर्टेशन सेफ्टी बोर्डा’च्या वर्ष २०१७ मधील पुनरावलोकनात बार्नेटच्या काही निरीक्षणांची निश्चिती करून घेण्यात आली. परिणामी बोईंगला सुधारात्मक कारवाई करण्याचा आदेश देण्यात आला. ![]() ♦ बोईंगचे तंत्रज्ञ रिचर्ड क्युवास यांनी वर्ष २०२३ मध्ये निकृष्ट उत्पादन केल्याचा आरोप केला होता. त्यानंतर त्यांनाही नोकरीतून बडतर्फ करण्यात आले होते. |
संपादकीय भूमिकाभारताने बोईंग समवेत २०० विमानांच्या खरेदीचा करार केलेला आहे. आता या करारावर पुनर्विचार करण्याची आवश्यकता आहे ! |


पुणे शहरात बांगलादेशी घुसखोरांचा सुळसुळाट !
Trump To Visit India : ट्रम्प पुढील वर्षीच्या आरंभी भारताच्या दौर्यावर येणार !
पिंपळी खुर्द आणि सती पुलाजवळील प्रदूषणकारी ‘भंगार व्यवसायां’च्या विरोधात कारवाई करा !
तुर्भे रेल्वेस्थानकाजवळील पदपथांच्या सुधारणेचे काम चालू !
कोच्चि (केरळ) : ६ बांगलादेशी घुसखोरांना अटक !
France Heat Wave : फ्रान्समध्ये कडक उन्हाळ्यामुळे एसी खरेदी करण्यासाठी दुकानांमध्ये मोठी गर्दी