१. ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी मार्गदर्शनाला आरंभ करताक्षणीच सहस्रो-लाखो वाईट शक्ती पूर्ण शक्तीनिशी परात्पर गुरु डॉक्टरांवर तुटून पडल्या’, असे दृश्य दिसणे

‘शंखनाद महोत्सवाच्या दुसर्या दिवशी, म्हणजे १८.५.२०२५ ला दुपारी गुरुदेवांचे सर्व साधकांसाठी मार्गदर्शन होते. त्या कार्यक्रमाला आरंभ होताक्षणीच मला काही गोष्टी पुष्कळ मोठ्या प्रमाणात जाणवू लागल्या. जे अनुभवून मी अवाक् झालो. परात्पर गुरु डॉक्टरांचा सन्मान केला जात असतांना किंवा परिचय करून दिला जात असतांना मी वातावरणात चैतन्य आणि आनंद अनुभवत होतो. मला पुष्कळ कृतज्ञता वाटत होती; परंतु परात्पर गुरु डॉक्टर मार्गदर्शन करणार त्याक्षणी ध्वनीक्षेपक (माइक) बंद होऊ लागले. ‘स्क्रीन’ बंद पडू लागले. त्या वेळी मला सूक्ष्मातून काही गोष्टी जाणवू लागल्या. सहस्रो-लाखो वाईट शक्ती पूर्ण शक्तीनिशी परात्पर गुरु डॉक्टरांवर तुटून पडल्या. हे पाहून ‘माझा आत्मासुद्धा हादरला’, असे मला जाणवले. मोठ्या वाईट शक्ती शिवीगाळ करत परात्पर गुरु डॉक्टरांवर आक्रमण करू लागल्या. त्याच वेळी लहान लहान वाईट शक्तींनी सूक्ष्मातून सर्व उपकरणांवर जोरदार आक्रमण केले. पुष्कळ मोठ्या सूक्ष्मातील युद्धाला आरंभ झाला.
२. लोकांपर्यंत विषय पोचावा; म्हणून सर्व संत आणि देवता यांचे वाईट शक्तींशी मोठे युद्ध आरंभ होणे अन् भयावहता सर्वांधिक असणारी आक्रमणे परात्पर गुरु डॉक्टरांनी स्वतःवर घेणे
सर्व ‘स्क्रीन’ मधे मधे बंद पडू लागले. उजव्या बाजूला असणारा एक ‘स्क्रीन’ जेथे संत बसले होते, तो चालू होता. बाकी ‘स्क्रीन’ बंद पडले. तेव्हा असे दिसत होते की, ‘उपकरणे चालू ठेवण्यासाठी सर्व संत त्यांची शक्ती वापरत आहेत आणि ते त्या माध्यमातून या युद्धात सहभागी होत होते. लोकांपर्यंत विषय पोचावा; म्हणून सर्व संत आणि देवता यांचे वाईट शक्तींच्या समवेत मोठे युद्ध आरंभ झाले; परंतु जी मुख्य आक्रमणे चालू होती, ज्यांची भयावहता सर्वांधिक होती, ती परात्पर गुरु डॉक्टरांनी स्वतःवर घेतली होती.
सनातनच्या ११२ व्या (समष्टी) संत पू. दीपाली मतकर यांना श्री. गणेश देशमुख यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये

१. धन्वन्तरि यागासाठी बसण्याविषयी विचारल्यावर श्री. गणेश देशमुख यांचा कृतज्ञताभाव जागृत होणे
‘लातूर येथील उद्योजक श्री. गणेश देशमुख यांना संपर्कासाठी सद्गुरु स्वाती खाडयेताई आणि आम्ही साधक गेल्यावर गणेशदादांना पुष्कळ आनंद झाला. दादांना ते आणि त्यांच्या पत्नी धन्वन्तरि यागासाठी बसण्याविषयी विचारल्यावर त्यांचा कृतज्ञताभाव जागृत झाला. ‘‘परात्पर गुरुदेव माझी निवड करत आहेत, हे माझे भाग्य !’’, असे ते आम्हाला म्हणाले.
२. महोत्सवाची निमंत्रण पत्रिका चैतन्यदायी असल्याने ती फ्रेम करून ठेवणार असल्याचे सांगणे
‘मी स्वतः तर महोत्सवासाठी अर्पण देतोच आणि माझ्या संपर्कातील काही जणांना अर्पण देण्यास सांगतो’, असे त्यांनी सांगितले. महोत्सवाची निमंत्रण पत्रिका ते बराच वेळ पहात होते. ‘ही निमंत्रण पत्रिका मी फ्रेम करून ठेवणार इतके तिच्यात चैतन्य आहे’, असे त्यांनी सांगितले.
३. स्वतःला हृदयविकाराचा झटका येऊनही ‘मी केवळ धन्वन्तरि यागाला बसतो म्हटले, तर देवाने माझे रक्षण केले’, असा भाव असणे
मुंबईहून येतांना त्यांना अचानक हृदयविकाराचा झटका आला. त्यांची ‘एन्जिओप्लास्टी’ झाली. साधकांनी त्यांना भ्रमणभाष केला. तेव्हा ते कृतज्ञताभावातच होते. ‘मी केवळ धन्वन्तरि यागाला बसतो म्हटले’, तर ‘देवाने माझे रक्षण केले’, असा त्यांचा भाव होता. यज्ञाला बसल्यावरही त्यांच्या डोळ्यांतून अखंड भावाश्रू वहात होते. ते भावावस्थेतच होते.’
– पू. दीपाली मतकर, सोलापूर. (२३.५.२०२५)
३. प.पू. डॉक्टर साधकांचे रक्षण करण्यासाठी सर्व शक्तींशी एकटे लढत उभे असणे आणि त्यांनी साधकांचे रक्षण करणे

परात्पर गुरु डॉक्टर वाईट शक्तींना सांगत होते, ‘तुम्ही काहीही करा. मी आज शंखनाद करणारच. आता हे युद्ध आरंभ झाले आहे. मी माझ्या साधकांना काहीही होऊ देणार नाही. तुम्ही काहीही करा. मी हिंदु राष्ट्र स्थापन करणारच आहे.’ इतक्या ठामपणे परात्पर गुरु डॉक्टर सांगत होते आणि सर्व आक्रमणे स्वतःवर घेऊन ते साधकांचे रक्षण करत होते. ज्याप्रमाणे कुटुंबप्रमुख सर्वांसमोर उभे राहून सर्वांचे रक्षण करतो, त्याप्रमाणे परात्पर गुरु डॉक्टर साधकांचे रक्षण करण्यासाठी सर्व शक्तींशी एकटे लढत उभे होते. ते पाहून ‘मी काहीच करू शकत नाही’, याची मला पुष्कळ लाज वाटत होती. ‘परात्पर गुरुदेव, तुम्ही आमच्यासाठी हा त्रास सहन करत आहात. गुरुदेव, तुम्ही असे करू नका.’ त्या वेळी माझ्या डोळ्यांतून अश्रू अनावर होत होते.
४. ‘आपल्या गुरूंनी एवढा त्रास सहन केला आहे आणि आपण येथे आरामात जेवत आहोत’, या विचाराने जेवण न जाणे
त्यानंतर जेवणाची वेळ झाली, तरीही माझी अखंड भावजागृती होत होती. ‘आपल्या गुरूंनी एवढा त्रास सहन केला आहे आणि आपण येथे आरामात जेवत आहोत’, या विचाराने मला जेवण जात नव्हते. मी जेवत असतांनासुद्धा अखंड रडत होतो. ‘माझा आत्मा आतून हे वेगळेच अनुभवत आहे’, हे मला जाणवले. असे यापूर्वी मी कधीही अनुभवले नव्हते.’
– श्री. गणेश देशमुख, लातूर. (२३.५.२०२५)
|
लक्षात घ्या, विज्ञानाची ही मर्यादा !
साधकांनो, येणार्या आपत्काळाला सामोरे जाण्यासाठी श्रद्धेच्या बळावर साधनेतील अडथळ्यांवर मात करा !
प्रभुदेसाई कुटुंबियांनी अनुभवलेली गुरुकृपा आणि त्यांचा सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती असलेला भाव !
व्यष्टी साधना गांभीर्याने करणारे म्हार्दाेळ (गोवा) येथील श्री. परशुराम प्रभुदेसाई (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय ७८ वर्षे) आणि सौ. पूनम प्रभुदेसाई (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय ७९ वर्षे) !
साधकांची आध्यात्मिक पातळी घोषित करण्याच्या सत्संगात फोंडा, गोवा येथील सौ. स्नेहा शिवदत्त नाडकर्णी यांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती !