
१. मुका मार लागणे
‘शरिराच्या कोणत्याही भागाला मार लागून तेथे सूज येते, वेदना होतात आणि तो भाग कधी कधी काळा-निळा होतो, त्याला ‘मुका मार लागणे’, असे म्हणतात. आरंभी आपण याकडे दुर्लक्ष करतो किंवा त्या वेळी तात्पुरत्या गोळ्या किंवा औषध घेतो. जर आपल्याला थोडे लागले आणि रक्त आले, तर ते चांगले असते; कारण तिथे थोडे रक्त येऊन ते थांबते आणि जखम काही दिवसांनी बरी होते; पण मुका मार लागल्यावर त्याचे परिणाम लगेच जाणवत नाहीत. २ – ३ वर्षांनी त्याचे परिणाम म्हणून आपल्याला त्या ठिकाणी दुखणे, सुजणे हे त्रास होऊ लागतात.

ज्या वेळी मुका मार लागून शरिराच्या एखाद्या भागाला केवळ सूज आली किंवा तो भाग काळा-निळा झाला असेल, तर त्या वेळी आपण अधिक काळजी घ्यायला हवी. नंतर पुष्कळ औषधोपचार करूनही फरक पडत नाही. थंडीमध्ये किंवा पावसाळ्याच्या दिवसांत आभाळ आल्यावर आपल्याला जिथे मुका मार लागलेला असतो, तिथे सूज येणे किंवा दुखणे हे त्रास चालू होतात.
२. लक्षणे
सूज येणे, वेदना होणे, तो भाग काळा-निळा होणे
३. उपाय
अ. मुका मार लागलेल्या ठिकाणी पुष्कळ वेदना होत असतील, तर दिवसातून २ – ३ वेळा बर्फाने प्रत्येकी १५ – २० मिनिटे शेकावे. काही दिवसांनी वेदना न्यून झाल्या आणि सूज असेल, तर गरम वस्तूने, म्हणजे गरम पाण्याची पिशवी किंवा ‘हिटिंग पॅड’ यांनी दिवसातून १ – २ वेळा प्रत्येकी १५ ते २० मिनिटे शेकावे. वेदना आणि सूज पूर्ण नाहीशी होईपर्यंत शेक द्यावा. शेक दिल्याने अंतर्गत मार बरा होतो आणि नंतर कोणताही त्रास होत नाही.

आ. आंबेहळद आणि रगतरोडा हे दोन्ही समप्रमाणात सहाणेवर पाण्यात उगाळावे अन् त्यांचा लेप करून दुखणार्या जागेवर लावावा. त्यामुळे सूज आणि वेदना त्वरित दूर होतात. हा उपाय ७ दिवस करावा. (आंबेहळद आणि रगतरोडा या वनस्पती आयुर्वेदाच्या औषधालयात उपलब्ध असतात.)
|
|
|
इ. ज्या भागाला मुका मार लागला असेल, त्या भागाची अधिक हालचाल करू नये.
ई. जर मुका मार लागलेल्या ठिकाणी सूज आणि वेदना वाढत असतील, तर तत्परतेने आधुनिक वैद्यांचा (डॉक्टरांचा) सल्ला घ्यावा.’
– डॉ. दीपक जोशी, निसर्गाेपचार तज्ञ (बॅचलर ऑफ नॅचरोपॅथी अँड योगिक सायन्स), देवद, पनवेल. (१८.२.२०२५)


शांत, संयमी, दूरदर्शी नेतृत्व, विनम्रता आणि सेवाभाव यांचा आदर्श असलेल्या आदरणीय दीदी !
डॉक्टरांना (आधुनिक वैद्यांना) मारून कुणाचा जीव वाचणार ?
हिंदूंना शत्रूबोध नाही !
भारतातील ‘डेटा सेंटर्स’मुळे निर्माण होणारे जलसंकट !
न्यायालयातील भाषेचा अडथळा : ‘लॅटिन’ संज्ञांमुळे सामान्य माणूस भारतीय कायद्यापासून दूर जात आहे का ?
समर्थ रामदासस्वामींच्या ‘दासबोधा’तील संदर्भांवरून ‘१०८’ या जपसंख्येचे महत्त्व !