१७ ते १९ मे २०२५ या कालावधीत फर्मागुडी (फोंडा, गोवा) येथे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ८३ व्या जन्मोत्सवानिमित्त ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवाचे सनातनच्या सूक्ष्म ज्ञानप्राप्तकर्त्या साधिका सुश्री मधुरा भोसले (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के) यांनी केलेले सूक्ष्म परीक्षण पुढे दिले आहे.

१. १८.५.२०२५ या दिवसाच्या दुसर्या सत्राचे सूक्ष्म परीक्षण

१ अ. ‘सनातन धर्मश्री’ पुरस्कार वितरण सोहळा
‘या दैवी सोहळ्यापासून हिंदुत्वाच्या कार्यात अतुलनीय योगदान देणार्या धर्मविरांना पुरस्कृत करून गौरवांकित करण्याची परंपरा प्रारंभ झाली.
१ आ. ‘सनातन धर्मश्री’ या पुरस्काराने गौरवांकित करण्यात आलेले धर्मवीर
१ आ १. श्री. प्रमोद मुतालिक (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के), संस्थापक, श्रीराम सेना

श्री. मुतालिक यांनी त्यांच्या मनोगतात सांगितले, ‘‘हा पुरस्कार व्यक्तीगत नसून तो व्यापक स्तरावर हिंदुत्वाचे कार्य सातत्याने करणार्या प्रत्येक धर्मविराला मिळाला आहे. तो समष्टी स्तरावरील पुरस्कार आहे.’’ यातून त्यांचा ‘समष्टी भाव’ आणि ‘व्यापकता’, हे गुण मला शिकायला मिळाले. त्यांनी हिंदूंना भ्याडपणा सोडून शस्त्र आणि शास्त्र समवेत घेऊन धर्मरक्षणासाठी सज्ज होण्याचे आवाहन केले.
१ आ २. श्री. अर्जुन संपथ (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के), संस्थापक, हिंदु मक्कल कत्छी (हिंदु जनता पक्ष), तमिळनाडू

यांच्या मनात सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती पुष्कळ कृतज्ञताभाव आणि आदरभाव जाणवतो. ‘अखंड हिंदु राष्ट्र स्थापन करण्यासाठी प्रत्येक हिंदूने प्रयत्नरत रहायला हवे’, हा प्रेरक विचार त्यांनी व्यक्त केला. त्यांना हिंदुत्वाचे कार्य करण्यासाठी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याकडून दैवी ऊर्जा मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. यातून त्यांचा सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रतीचा निस्सीम कृतज्ञताभाव जाणवला.
१ आ ३. श्री. टी. राजासिंह (राजाभैया, आध्यात्मिक पातळी ६१ टक्के), हिंदुत्वनिष्ठ आमदार, तेलंगाणा

प्रखर हिंदुत्वनिष्ठ आणि धर्मयोद्धा असलेल्या राजाभैया यांच्या आगमनानेच प्रेक्षकांमध्ये उत्साह निर्माण झाला अन् ‘जय श्रीराम ।’ या घोषणा देऊन धर्मप्रेमी प्रेक्षकांनी त्यांचे स्वागत केले. राजाभैयांनी ‘येणार्या काळात सर्व हिंदूंनी युद्धजन्य परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी सज्ज झाले पाहिजे’, असे उद्गार काढून हिंदूंमध्ये वीरश्री निर्माण केली.
१ आ ४. अधिवक्ता अरुण श्याम, माजी अतिरिक्त महाअधिवक्ता, कर्नाटक

यांच्यामध्ये मला सेवाभाव, संतांप्रतीचा विनम्रभाव आणि कृतज्ञताभाव अन् ईश्वराप्रतीचा समर्पितभाव जाणवला.
१ आ ५. डॉ. कोनराड एल्स्ट, हिंदुत्वनिष्ठ लेखक, बेल्जियम

हे भारतातील हिंदु संस्कृतीने प्रभावित झाले असल्याने त्यांच्या मनात भारताविषयी नितांत आदरभाव आहे. ते विश्वशांतीसाठी हिंदु राष्ट्राचे समर्थन करत असून हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी पूर्णपणे समर्पित आहेत. त्यांच्यामध्ये ‘हिंदु धर्मसंस्थापनेची तीव्र तळमळ’ आणि ‘धर्माप्रतीचा अनन्यभाव’ आहे.
१ आ ६. श्री. प्रबल प्रताप सिंह जुदेव, भाजप, छत्तीसगड

हे हिंदुत्वाच्या रक्षणासाठी सातत्याने झुंजणारे आणि हिंदुहिताचे रक्षण प्राणपणाने करणारे राष्ट्र, धर्म अन् समाज यांचे सेवक अन् आदर्श धर्मवीर-योद्धा आहेत. त्यांनी हिंदूंना धर्मतेज जागृत ठेवून स्वाभिमानाने जगण्यासाठी धर्माभिमान आणि सांघिकभाव जोपासण्यास सांगितले. यावरून ‘ते धर्मरक्षक असण्यासह हिंदूंचे कुशल संघटकही आहेत’, असे प्रकर्षाने जाणवले.’
– सुश्री मधुरा भोसले (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१८.५.२०२५)
|
‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’च्या वेळी साधिकेला सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले साधकांना एका जहाजातून कुठेतरी घेऊन जात आहेत’, असे जाणवून सुरक्षित वाटणे
Chhattisgarh CM Vishnu Deo Sai : छत्तीसगडमधील सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारशाच्या जतनासाठी राज्यशासन सनातन संस्थेला साहाय्य करणार !
‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’च्या स्थळी सनातन राष्ट्रध्वज फडकवण्याच्या वेळी साधिकेला जाणवलेली सूत्रे
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या खोलीतील देवघरातील सूर्यदेवाच्या चेहर्याच्या प्रतिमेत झालेले पालट आणि त्यामागील अध्यात्मशास्त्र !
नमस्काराच्या मुद्रेच्या संदर्भातील सूक्ष्मातील प्रयोग
इस्माईलला मुसलमान समाजातून बहिष्कृत करावे ! – भाजप