‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ८३ व्या जन्मोत्सवानिमित्त १७ ते १९ मे २०२५ या कालावधीत फोंडा, गोवा येथे ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी झालेल्या विविध कार्यक्रमांच्या अंतर्गत १८.५.२०२५ या दिवशी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या पावन हस्ते ‘सनातन राष्ट्रध्वज’ फडकवण्यात आला. त्या वेळी तो ध्वज खांबाच्या वर गेला; परंतु प्रारंभी फडकला नाही. त्या वेळी मला पुढीलप्रमाणे जाणवले,

१. ‘श्रीकृष्ण गोव्यात, म्हणजे पृथ्वीवर ईश्वरी राज्य स्थापन करण्याविषयीचा संकल्प करत आहे. त्यामुळे सर्वप्रथम तो ध्वज सर्व उच्च लोकांमध्ये आणि संपूर्ण ब्रह्मांडात फडकायला हवा.
२. सर्व जगतामध्ये ईश्वरी राज्याच्या स्थापनेची माहिती मिळाल्यानंतर आणि उच्च लोकांतील प्रत्येक ठिकाणी ‘सनातन राष्ट्रध्वज’ फडकल्यानंतरच महोत्सवाच्या ठिकाणी तो ध्वज फडकणार आहे.
३. सर्व साधक आधीपासूनच ‘सनातन राष्ट्रध्वजा’च्या खाली आहेत आणि श्रीकृष्णाला साधक प्रिय असल्याने तो त्या सर्वांची काळजी घेणारच आहे.’
मला ही अनुभूती दिल्याबद्दल मी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले आणि श्रीकृष्ण यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करते.’
एक साधिका (२३.५.२०२५)
असे नेते देशाचे कधी भले करू शकतील का ?
‘आपले खरे कुटुंब हे आपले साधक आहेत’, या सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या वचनाची साधिकेला आलेली प्रचीती !
राष्ट्रप्रेमी, धर्माभिमानी आणि इतरांना साहाय्य करणारे अन् सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असलेले ६२ टक्के आध्यात्मिक पातळीचे मुंबई येथील श्री. मुंडाची वेदव्यास पै (वय ९१ वर्षे) !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी साधकांना सत्संगात केलेले अनमोल मार्गदर्शन !
संत ज्ञानेश्वर महाराज यांनी वर्णिलेले सद्गुरुमाहात्म्य आणि त्यातून श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी उलगडलेले सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे अवतारत्व !
साधकांनो, शब्दशक्तीच्या माध्यमातून विकल्प पसरवण्यासाठी कार्यरत असलेल्या सातव्या पाताळातील मोठ्या वाईट शक्तींचा डाव ओळखून साधना वाढवा !