हवनाद्वारे उपचार करण्याला मिळाली मान्यता !
अजमेर (राजस्थान) – अजमेर मेडिकल कॉलेजच्या मायक्रोबायोलॉजी (सूक्ष्मजीवशास्त्र) विभागाचे डॉ. विजयलता रस्तोगी यांना हवनाद्वारे उपचार करण्याचे ‘पेटंट’ (स्वामीत्व) मिळाले आहे. पेटंट मिळणे म्हणजेच ही उपचार पद्धती वैज्ञानिक दृष्टीने ग्राह्य धरलेली आहे.
१. अनेक वर्षांच्या संशोधनातून त्यांनी सिद्ध केले आहे की, हवन सामग्रीमध्ये वापरण्यात येणार्या औषधी वनस्पती आणि नैसर्गिक घटक यांपासून निर्माण होणारा धूर काही विशिष्ट हानीकारक जीवाणूंना (बॅक्टेरियांना) नष्ट करण्याची क्षमता ठेवतो.
२. काही विशिष्ट हवन साहित्यांमध्ये जीवाणूनाशक गुणधर्म असतात, जे संसर्ग पसरवणार्या बॅक्टेरियावर थेट परिणाम करतात.
हवनाद्वारे उपचार कसा केला जातो ?
रुग्णाला एका विशेष कक्षात ठेवण्यात येईल. त्या खोलीत हवन केले जाईल आणि त्याचा धूर संपूर्ण खोलीत पसरवला जाईल. रुग्ण तो धूर श्वासाद्वारे ग्रहण करेल आणि त्यामुळे शरिरात असलेल्या हानीकारक बॅक्टेरियावर परिणाम होईल. राजस्थान सरकारने या उपचार पद्धतीसाठी अर्थसंकल्पात निधी संमत केला आहे.
वैज्ञानिक काय म्हणतात ?
वैज्ञानिक आणि औद्योगिक अनुसंधान परिषदेच्या संशोधनात असे नमूद केले आहे की, हवनामुळे हवेत असणार्या हानीकारक सूक्ष्मजंतूंची संख्या ९४ टक्क्यांपर्यंत घटू शकते. घरांमध्ये आणि रुग्णालयांमध्ये हवेद्वारे होणार्या आजारांचा धोका न्यून होतो.
इतरही अनेक संशोधनांमध्ये सिद्ध झाले आहे की, हवनामुळे पर्यावरण शुद्ध होते. जिथे हवन केले जाते, तिथे हानीकारक जीवाणूंची संख्या न्यून होते.
यापूर्वी राजस्थानचे शिक्षणमंत्री मदन दिलावर म्हणाले होते की, हवनामध्ये १० ग्रॅम देशी गायीचे तूप घातल्यास एक टन ऑक्सिजन उपलब्ध होते. आज या विधानाची सत्यता लक्षात येते.
संपादकीय भूमिकाहिंदूंच्या धार्मिक कृतींमागे विज्ञान असून त्याचा मानवाला आणि निसर्गाला लाभ होत असतो, हे त्यांचा नीट अभ्यास केल्यावर लक्षात येते; मात्र हिंदुद्वेषी, नास्तिकतावादी आणि पुरो(अधो)गामी ‘स्वतःला अधिक कळते’ या अहंभावातून यांवर टीका करतात, हे लक्षात घ्या ! |

‘बालभारती’च्या इतिहासात प्रथमच १ वर्षात ४ इयत्तांची पाठ्यपुस्तके नव्याने प्रकाशित !
गळ्यातील दागिने हिसकावणार्या कामिल आणि अहमद यांना अटक !
पीडित तरुणींना दाखवले जात होते झाकीर नाईक आणि पाकिस्तानी मौलवी तारिक जमील यांचे व्हिडिओ !
विसर्जित श्रीगणेशमूर्तींच्या ‘पीओपी’पासून बनवली जाणार बाकडी, विटा अन् शोभेच्या वस्तू !
खारघर (नवी मुंबई) येथे ‘हेअर स्पा’ करतांना मुसलमान युवकाने हिंदु महिलेचे चुंबन घेतले !
भाजप तमिळनाडूचे माजी प्रदेशाध्यक्ष के. अण्णामलाई स्वत:चा पक्ष स्थापन करणार !