२५० एफ्.एस्.आय. पेक्षा उंच इमारतींना ‘व्हर्टिकल फॉरेस्ट’ सक्तीचे

(फ्लोअर स्पेस रेशो (एफ्.एस्.आय.) म्हणजे इमारतीच्या बांधकामाचे क्षेत्रफळ आणि भूखंडाचे क्षेत्रफळ यांचे प्रमाण)
(व्हर्टीकल फॉरेस्ट म्हणजे इमारत बांधकामाच्या आराखड्यात झाडे लावण्यासाठी सुविधा निर्माण करणे)
मडगाव, ५ जून (वार्ता.) – गोवा राज्यात पुढील ३ मासांच्या कालावधीत विविध ठिकाणी सुमारे ५ लाख वृक्षांची लागवड केली जाणार, अशी माहिती वनमंत्री विश्वजीत राणे यांनी दिली. ते म्हणाले, ‘‘पालिका क्षेत्रांतही जागा उपलब्ध असल्यास वृक्षारोपण केले जाईल. तसेच २५० एफ्.एस्.आय. (फ्लोअर स्पेस रेशो) अधिक असलेल्या उंच इमारतींना ‘व्हर्टिकल फॉरेस्ट’ केल्याविना कोणत्याही प्रकारे अनुज्ञप्ती मिळणार नाही.’’
On the occasion of #WorldEnvironmentDay, we are reinforcing our commitment to sustainable development and climate-resilient infrastructure.
As part of this, it has been decided that all buildings exceeding 250 and above FSI will be mandated to incorporate vertical forests and… pic.twitter.com/8krxQ0PIER
— Vishwajit Rane (@visrane) June 5, 2025
मडगाव येथील सोनसडो कचरा प्रकल्पाच्या ठिकाणी अल्प जागेत दाट जंगल उभारण्याविषयीचा उपक्रम चालू करण्यात आला आहे. याचा प्रारंभ नगरनियोजन मंत्री विश्वजीत राणे, आमदार दिगंबर कामत, मडगावचे नगराध्यक्ष दामू शिरोडकर आणि इतर नगरसेवक यांच्या उपस्थितीत करण्यात आला. या योजनेच्या अंतर्गत सोनसडो परिसरात धूप, जाम, आंबे, पिंपळ, कदंब, कोकम, बेल, चिंच, सागवान, पेरू यांसारखी झाडे लावण्यात आली. या वेळी वन खात्याचे आणि नगरनियोजन खात्याचे अधिकारी उपस्थित होते.

विश्वजीत राणे पुढे म्हणाले, ‘‘घनदाट जंगलाविषयीच्या पहिल्या प्रकल्पासाठी वन खात्याने सोनसडो प्रकल्प निवडला आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर यामागे असलेला कचराही दिसून येणार नाही. अशा प्रकारे शहरी भागात घनदाट जंगलाची संकल्पना अस्तित्वात येणार आहे. त्याचप्रमाणे २५० किंवा त्याहून अधिक एफ्.एस्.आय. असलेल्या इमारतींवर ‘व्हर्टीकल फॉरेस्ट’ लावण्यासंबंधी निर्णय घेण्यात आला आहे. याची अधिसूचना पुढील आठवड्यात येईल. त्याखेरीज इमारतींना पांढरा रंग देण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे तापमान योग्य राखले जाते.
सिंगापूरमध्ये वैज्ञानिक दृष्टीने अभ्यास करून अशा प्रकारच्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत. याखेरीज इमारतींची उंची, वाहनतळाची सुविधा आणि इतर सुविधा यांसाठी काही निर्णय घेण्यात येणार आहेत.’’
भंडारा येथे अन्न आणि औषध प्रशासनाची २ औषध प्रतिष्ठानांवर कारवाई !
उन्हाळा इतका तीव्र का होत आहे ? विदेशी झाडे का नको ?
राज्याचे ‘क्वांटम’ आणि ‘डीप टेक’ धोरण लवकरच आणण्यात येणार ! – मुख्यमंत्री
यवत (पुणे) येथे विनाअनुमती गर्भलिंग निदान करणारा मुख्य सूत्रधारास अटक !
मुलीला मारल्याची न्यायबाह्य स्वीकृती आरोपीने दिली होती ! – ग्रामस्थाने दिली साक्ष
पाकिस्तानशी संबंधित ‘रील्स’ पाहिल्यामुळे अहिल्यानगर येथील तरुणांची चौकशी !