
मुंबई – महाराष्ट्र हे देशात सर्व क्षेत्रांत अग्रगण्य राज्य आहे. लोकोपयोगी कायदे निर्मितीमध्येही राज्य देशात अग्रेसर आहे. राज्याच्या कायद्याचे अनुकरण देशातील इतर राज्यच नाही, तर अन्य देशही करतात, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले. विधी आणि न्याय विभागाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमात सह्याद्री अतिथीगृह येथे ते बोलत होते. या वेळी विधी विधान शाखेच्या बोधचिन्हाचे अनावरण आणि ५ पुस्तकांचे प्रकाशन फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.
फडणवीस पुढे म्हणाले की, महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये विधी आणि न्याय विभागाचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. कायदा निर्मितीमध्ये विधी आणि न्याय विभागाचे महत्त्वपूर्ण योगदान असते. राज्याचे अनेक कायदे देशाने स्वीकारले आहेत.
कायद्याची निर्मिती होत असतांना विधीमंडळात कायद्यांवर ३-३ दिवस चर्चा होते. चर्चेतून कायदा अस्तित्वात येत असतो. या विभागाचे सुवर्ण महोत्सवी वर्ष असून निश्चितच या विभागात परिवर्तनाचा आरंभ या वर्षीपासून करावा.
सध्याची परिस्थिती लक्षात घेऊन लोकोपयोगी कायद्यांची निर्मिती करावी लागते. या संपूर्ण प्रक्रियेत ‘कायदा लिहिणे’ अत्यंत महत्त्वाचे असते. लोकांच्या हिताच्या दृष्टीने कायदा कसा असावा ? असा शासनाचा नेहमी प्रयत्न असतो. विधी आणि न्याय विभागाने निर्मित केलेली पुस्तके पुढील पिढीसाठी ठेवा आहेत. हे संदर्भ साहित्य म्हणून निश्चितच कायदा निर्मितीमध्ये उपयोगात येणार आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
‘महा-एआय मॉडेल’द्वारे माहिती-आधारित प्रशासन उभारण्याच्या दिशेने शासनाचे महत्त्वाचे पाऊल ! – देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री
आषाढी वारीत भाविकांची गैरसोय होणार नाही, याची काळजी घ्या ! – CM Devendra Fadnavis
महिला सदस्यांच्या समितीद्वारे लैंगिक शोषणविरोधी कायद्यांचे पुनरावलोकन करावे !
महाराष्ट्रात ४ महिन्यांत २५४ कोटी ५३ लाख रुपयांचे अमली पदार्थ जप्त केले ! – CM Devendra Fadnavis
संवाद साधण्याला प्रयत्न; परंतु राजकारण केल्यास राजकीय उत्तर देऊ ! – देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री
आजारांना दूर ठेवण्यासाठी ‘योग’ हा रामबाण उपाय ! – मुख्यमंत्री फडणवीस