|

मुंबई – ऑनलाईन किराणा घरपोच करणार्या ‘किरणाकार्ट टेक्नोलॉजीज् प्रा.लि.’ (झेप्टो) या आस्थापनाच्या धारावी येथील गोदामावर अन्न आणि औषध प्रशासन विभागाने (‘एफ्.डी.ए.’ने) धाड घातली. या वेळी तेथे अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन झाल्याचे दिसून आले. या प्रकरणी तात्काळ कारवाई करून ‘एफ्.डी.ए.’ने आस्थापनाचा अन्नउत्पादन परवाना निलंबित केला.
या आस्थापनाकडून अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन केले जात असल्याची माहिती ‘एफ्.डी.ए.’ला मिळाली होती. त्यानुसार धारावी येथील गोदामावर अन्नसुरक्षा अधिकार्यांनी धाड घातली. या वेळी पडताळणी करतांना काही अन्नपदार्थांवर बुरशी आढळली. हे पदार्थ साचलेल्या, तसेच अस्वच्छ पाण्याजवळ ठेवण्यात आले होते. ज्या पदार्थांची साठवणूक शीतकपाटामध्ये केली होती, तेथील तापमानही नियमानुसार नव्हते. गोदामासह संपूर्ण परिसर ओलसर दमट होता. अन्नसामग्री भूमीवर ठेवण्यात आली होती आणि मुदतबाह्य झालेली उत्पादने अन्य उत्पादनांसमवेत ठेवण्यात आली होती. या आस्थापनाकडे परवाना असला, तरी गोदामात पदार्थ गलिच्छ स्थितीत ठेवण्यात आले होते.
अन्नसुरक्षा आणि मानके अधिनियम २००६ अन् अन्नव्यवसाय परवाना, तसेच नोंदणी नियम २०११चे गंभीर उल्लंघन केल्याविषयी झेप्टो आस्थापनाचा परवाना तात्काळ निलंबित करण्यात आल्याचे साहाय्यक आयुक्त (अन्न) अनुपमा पाटील यांनी सांगितले. आता सर्व अटींचे पालन करून आणि अधिकृत मान्यता घेईपर्यंत नवा परवाना संमत होणार नसल्याचे ‘एफ्.डी.ए.’कडून सांगण्यात आले.
डॉक्टरांनी ८ सहस्र रुपये घेऊन हाड जोडले; पण उर्वरित रक्कम न मिळाल्याने ते पुन्हा तोडल्याचा आरोप !
Ladki Bahin Yojana : ५ लाख सरकारी कर्मचारी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचा अपलाभ घेत असल्याचे उघड !
Aland Dargah Conflict : आळंद लाडले मशाक दर्गा दंगलीतील सर्व मुसलमान आरोपींवरील गुन्हे कर्नाटकच्या काँग्रेस सरकारने घेतले मागे
Noida DJ Processions : वरातीत ‘डीजे’ लावणार्यांच्या लग्नावर संपूर्ण गाव बहिष्कार घालणार !
‘होम मिनिस्टर – खेळ पैठणीचा’ : स्त्री सन्मानाचा प्रश्न !
नागपूर येथील उपाहारगृहांतील पनीरऐवजी ‘चीज ॲनालॉग’ वापरल्यास परवाना होणार रहित