१ मे पासून कठोर नियम लागू !

नागपूर – उपाहारगृहात खर्या पनीरऐवजी स्वस्त आणि आरोग्यास घातक ठरू शकणारे ‘चीज ॲनालॉग’ (चीजसारखे दिसणारे; परंतु चीज नसणारे पदार्थ) वापरणार्या उपाहारगृहांवर अन्न आणि औषध प्रशासनाने कडक कारवाईची चेतावणी दिली आहे. ग्राहकांची दिशाभूल टाळण्यासाठी पदार्थांच्या सूचीवर त्यांचे खरे स्वरूप नमूद करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
जर उपाहारगृहांत ‘ॲनालॉग’ वापरले जात असेल, तर त्याला ‘पनीर सँडविच’ म्हणता येणार नाही. त्यावर ‘चीज ॲनालॉग सँडविच’ असा स्पष्ट उल्लेख करावा लागेल. सर्व हॉटेलनी १ मेपूर्वी त्यांच्या सूचीत हे पालट करणे आवश्यक आहे. नियमांचे उल्लंघन करणार्या उपाहारगृहांवर केवळ दंडच आकारला जाणार नाही, तर त्यांचा परवानाही कायमचा रहित केला जाऊ शकतो. अशा प्रकारचे परिपत्रक काढणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे. केंद्र सरकारही आता यावर स्वतंत्र कायदा आणण्याच्या सिद्धतेत असून दुग्धव्यवसाय उद्योगाकडून यावर सूचना मागवण्यात येत आहेत. (केवळ परिपत्रक काढून चालणार नाही, तर प्रशासनाने सातत्याने उपाहारगृहांवर धाडी घालून अन्नाची गुणवत्ता पडताळायला हवी ! – संपादक)
डहाणू (जिल्हा पालघर) येथे होणार जगातील सर्वांत मोठ्या कृषी बाजाराची उभारणी !
थोडक्यात महत्त्वाचे (दि : १५.०७.२०२६)
कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मीदेवी मंदिरात पाण्याची गळती !
आषाढी यात्राकाळात पंढरपूरमध्ये मांस, मटण विक्रीवर बंदी !
कनिष्ठ न्यायालयाने दिलेला जामीन उच्च न्यायालयाकडून रहित
आडाळी ‘एम्.आय.डी.सी.’मध्ये अवैधरित्या झालेल्या उत्खननाची उच्चस्तरीय चौकशी चालू !