एका तरुणी समवेत लिव्ह-इन-रिलेशनशिपमध्ये राहिल्याने घेतला निर्णय

पाटलीपुत्र (बिहार) – राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री राहिलेले लालूप्रसाद यादव यांनी त्यांचे ज्येष्ठ पुत्र आणि आमदार तेज प्रताप यादव यांना कुटुंबातून, तसेच पक्षातून ६ वर्षांसाठी काढून टाकले आहे. या संदर्भात लालूप्रसाद यांनी फेसबुकवर पोस्ट करत ही माहिती दिली. तेज प्रताप यादव यांचा एका तरुणीसमवेत असलेला व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाला आहे. यानंतर ही कारवाई करण्यात आली.

१. तेज प्रताप यांच्या फेसबुक खात्यावरून छायाचित्र पोस्ट करून लिहिले होते, ‘मी अनुष्का यादव हिच्यासमवेत गेल्या १२ वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहे.’ काही काळानंतर ही पोस्ट पुसून टाकण्यात आली. यानंतर तेज प्रताप यांनी त्यांच्या ‘एक्स’ खात्यावरून पोस्ट करत म्हटले की, त्यांचे खाते हॅक झाले होते. ही एक बनावट पोस्ट आहे आणि छायाचित्र संकलित (एडिट) केला आहे, असा दावा केला; मात्र त्यांच्या दाव्यानंतर ६ छायाचित्रे आणि २ व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित होत आहेत. यामध्ये तेज प्रताप यांच्या अनुष्का समवेतच्या विवाहाचे दावे केले जात आहेत.
२. लालूप्रसाद यादव यांनी म्हटले आहे की, वैयक्तिक जीवनात नैतिक मूल्यांकडे दुर्लक्ष केल्याने सामाजिक न्यायासाठीचा आपला सामूहिक संघर्ष दुर्बल होतो. मोठ्या मुलाचे कृत्य, सार्वजनिक वर्तन आणि दायित्वशून्य वर्तन आमच्या कौटुंबिक मूल्ये अन् परंपरा यांनुसार नाही. म्हणून वरील परिस्थितीमुळे, मी त्याला पक्ष आणि कुटुंबापासून दूर ठेवतो. ते स्वतः त्यांच्या वैयक्तिक जीवनातील चांगले-वाईट आणि गुण-दोष पहाण्यास सक्षम आहेत. ज्यांचे त्यांच्याशी संबंध आहेत त्यांनी स्वतःच्या विवेकबुद्धीने निर्णय घ्यावेत. मी नेहमीच सार्वजनिक जीवनात सार्वजनिक लज्जेचा समर्थक राहिलो आहे. कुटुंबातील आज्ञाधारक सदस्यांनी सार्वजनिक जीवनात ही कल्पना स्वीकारली आहे आणि तिचे पालन केले आहे. धन्यवाद.
मंगेशी येथे स्व. लता मंगेशकर आणि स्व. आशा भोसले यांचे स्मारक आणि संग्रहालय उभारणार ! – पर्यटनमंत्री रोहन खंवटे
दौंडमध्ये गुळात साखरेची भेसळ केलेला १७ लाखांचा साठा जप्त !
म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष यू मिन आंग ह्लाईंग यांचे मुंबईत स्वागत !
संपादकीय : सरकारची ऑनलाईन फसवणूक !
पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरांमध्ये अवैध मद्यविक्री करणार्यांवर २३ गुन्हे नोंद !
पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या प्रशासकपदी जिल्हाधिकार्यांची नियुक्ती !