हिंदु राष्ट्र-स्थापनेविषयीच्या ग्रंथमालिकेची निर्मिती

गुरुदेवांनी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेची भूमिका स्पष्ट करण्यासाठी ‘हिंदु राष्ट्राची स्थापना’, याविषयीच्या ग्रंथमालिकेचे संकलन केले असून त्यात ‘ईश्वरी राज्याची स्थापना’, ‘हिंदु राष्ट्र का हवे ?’, ‘हिंदु राष्ट्राच्या स्थापनेची दिशा’, ‘हिंदु राष्ट्र : आक्षेप आणि खंडण’ इत्यादी ग्रंथांचा समावेश आहे.
संतांच्या भेटी आणि सर्वसंप्रदाय सत्संग, सर्वधर्मसभा इत्यादींचे आयोजन

वर्ष २००० ते २००२ या कालावधीत गुरुदेवांनी ‘राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणासाठी विविध संप्रदाय अन् संत यांनी एकत्र येऊन कार्य करावे’, यासाठी महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक या राज्यांतील ११० हून अधिक संतांच्या भेटी घेतल्या. त्यांनी काही ठिकाणी संत-बैठका, सर्वसंप्रदाय सत्संग, सर्वधर्मसभा इत्यादी आयोजित केले. यांत करवीर पिठाचे जगद्गुरु शंकराचार्य विद्याशंकर भारती (कोल्हापूर), जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज (नाणीज, रत्नागिरी), प.पू. गगनगिरी महाराज (गगनबावडा, जिल्हा कोल्हापूर), पीर सैय्यद हुसेनमियाँ कादरी नक्षबंदी (मुंबई) इत्यादी अनेक संत उपस्थित होते.
लोकशाहीतील दुष्प्रवृत्तींच्या निर्मूलनासाठीचे कार्य

‘शासकीय कामांत भ्रष्टाचार आणि अकार्यक्षमता’, असा अनुभव अनेकांना येतो. न्यायालयात ५ कोटी २५ लाखांहून अधिक अभियोग (खटले) प्रलंबित आहेत. शिक्षण, आरोग्य, व्यापार इत्यादी सामाजिक क्षेत्रांतही दुष्प्रवृत्ती प्रबळ बनल्या असून त्या प्रतिदिन जनतेचे शोषण करत आहेत. लोकशाहीतील या दुष्प्रवृत्तींमुळे स्वराज्याचे सुराज्य करण्यात अडथळे उत्पन्न होतात. गुरुदेवांनी ‘अन्याय सहन करू नका, तर शासकीय आणि सामाजिक दुष्प्रवृत्तींच्या विरोधात लोकशाही मार्गाने लढा द्या !’, अशी शिकवण दिली आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि प्रेरणेने कार्य करणार्या संघटना अन् व्यक्ती यांनी शासकीय क्षेत्रातील ६ भ्रष्टाचार्यांना पकडून दिले, तसेच अनेक शासन-नियंत्रित मंदिरे आणि कार्यालये यांतील भ्रष्टाचार उघडकीस आणला.
अधिवेशनांद्वारे देशभक्त आणि हिंदुत्वनिष्ठ यांचे संघटन

वर्ष २०११ मध्ये गुरुदेवांनी ‘देशभक्त आणि हिंदुत्वनिष्ठ यांच्या संघटनातूनच हिंदु राष्ट्र-स्थापनेचे कार्य होऊ शकते. यासाठी भारतभरातील राष्ट्रप्रेमी आणि हिंदुत्वनिष्ठ संघटनांना एकत्रित करणारे व्यासपीठ असावे’, असा विचार सर्वप्रथम मांडला. या विचारातून प्रेरणा घेऊन वर्ष २०१२ पासून ‘हिंदु जनजागृती समिती’ प्रतिवर्षी गोवा येथे ‘अखिल भारतीय हिंदु राष्ट्र-अधिवेशन’, तर अन्यत्र राज्यस्तरीय अन् जिल्हास्तरीय हिंदू अधिवेशने आयोजित करत आहे. वर्ष २०२३ पासून ‘अखिल भारतीय हिंदु राष्ट्र-अधिवेशना’चे स्वरूप अधिक व्यापक झाल्यामुळे त्याचे नामकरण ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सव’ असे करण्यात आले.
यज्ञाला विरोध करणार्यांनी, हे लक्षात घ्यावे !
देवाला नैवेद्य दाखवून स्वतःच खायचा ! काय अर्थ आहे मग त्या नैवेद्य दाखवण्याचा ?
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या दुहेरी नागरिकत्वप्रकरणी प्रयागराज (उत्तरप्रदेश) उच्च न्यायालयाच्या लक्ष्मणपुरी खंडपिठासमोर पेच !
सनातन धर्माला संपवणारे तुम्ही कोण ?
भारताला विनाशाकडे नेणारा ‘वोकिझम’ !
परीक्षांमधील प्रश्नपत्रिका फुटण्यामुळे विद्यार्थ्यांच्या आणि समाजाच्या भवितव्याविषयी प्रश्नचिन्ह !