जागतिक आरोग्य संघटनेच्या बैठकीत भारताने पाकला सुनावले !

जिनिव्हा (स्वित्झर्लंड) – पाकिस्तान आतंकवादाचा केंद्रबिंदू आहे आणि त्याला स्वतःला ‘आतंकवादाचा बळी’ असल्याचे भासवण्याचा कोणताही अधिकार नाही. पाकिस्तान आतंकवादाला जन्म देतो आणि त्याचे पालनपोषण करतो अन् जगाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतो, अशा शब्दांत जागतिक आरोग्य संघटनेच्या बैठकीत भारतीय राजदूत अनुपमा सिंह यांनी पाकला सुनावले.
🇮🇳 India slams 🇵🇰 at the @WHO meeting!
💣 Pakistan remains the epicentre of terrorism, nurturing extremism while deceiving the world.
🐍 No matter how many times it's warned, Pakistan won’t change — it’s like a crooked tail that won’t straighten.
✂️ Sometimes, the only fix is… pic.twitter.com/yWk1WgKemt
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) May 23, 2025
अनुपमा सिंह पाकचा आतंकवादी चेहरा उघड करतांना म्हणाल्या की, २२ एप्रिल या दिवशी पहलगाम येथे झालेल्या आतंकवादी आक्रमणात पाकिस्तानमध्ये प्रशिक्षण घेतलेले आतंकवादी सहभागी होते, ज्यामध्ये २६ हिंदु पर्यटकांचा मृत्यू झाला होता. या आतंकवाद्यांनी लोकांना त्यांच्या कुटुंबियांसमोर गोळ्या घातल्या. यानंतर भारताने केलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’द्वारे पूर्ण अचूकता आणि लक्ष केंद्रित करून केवळ आतंकवादी अड्डे यांना लक्ष्य करत त्यांच्यावर आक्रमण केले. पाकिस्तान ‘सिंधू जल वाटप करारा’च्या संदर्भातही खोटे आरोप करत आहे. तो सीमापार आतंकवादाला प्रोत्साहन देऊन प्रत्येक कराराचे सतत उल्लंघन करत आहे.
संपादकीय भूमिकापाकिस्तान म्हणजे कुत्र्याची शेपूट असून त्याला कितीही सरळ करण्याचा प्रयत्न केला, तरी ती सरळ होणार नसल्याने तिला कापणे हाच त्यावरील एकमेव पर्याय आहे. त्यामुळे त्याला कितीही सुनावले, तरी त्याच्यावर काहीच परिणाम होणार नाही ! |
चिंचवड (पुणे) येथील श्री मोरया गोसावी मंदिर परिसरातील यात्रेत ‘मेड इन पाकिस्तान’ लेबल असलेल्या चादरीची विक्री !
‘एक भक्कम पाकिस्तान अमेरिकेच्या हितासाठी अत्यंत आवश्यक !’ – अमेरिका
Terrorist Allahbaksh Arrested : तुमकुरू (कर्नाटक) येथील अल्ला बक्षला अटक
भारतावर दबाव आणणे जागतिक स्थिरतेसाठी अत्यंत घातक ! – Russian President Putin
पाकिस्तानशी संबंधित ‘रील्स’ पाहिल्यामुळे अहिल्यानगर येथील तरुणांची चौकशी !
Japan Illegal Mosque : जपानमध्ये पाकिस्तानने बांधलेली अवैध मशीद पाडणार !