शनिशिंगणापूर मंदिराच्या पवित्र चौथर्‍यावर मुसलमान कर्मचार्‍यांना प्रवेश !

३०० मुसलमान कर्मचार्‍यांना हटवून मंदिराची सात्त्विकता राखण्याची महाराष्ट्र मंदिर महासंघाची मागणी

शनिदेवाच्या चौथर्‍यावर चढून काम करणारे मुसलमान कामगार

अहिल्यानगर – कोट्यवधी हिंदूंचे श्रद्धास्थान असलेल्या श्री शनिशिंगणापूर मंदिराच्या पवित्र चौथर्‍यावर २१ मे या दिवशी मुसलमान कर्मचार्‍यांकडून ‘ग्रिल’ बसवण्याचे काम करण्यात आले. ही घटना अत्यंत धक्कादायक असून मंदिरातील सात्त्विकता आणि धार्मिक परंपरा भंग करणारी आहे. यामुळे स्थानिक ग्रामस्थ संतप्त आहेत. या घटनेचा महाराष्ट्र मंदिर महासंघाने तीव्र निषेध केला असून महासंघाचे राष्ट्रीय संघटक श्री. सुनील घनवट म्हणाले की, संबंधित मुसलमान कर्मचार्‍यांचे काम तात्काळ थांबवण्यात यावे. येथे कार्यरत असणार्‍या ३०० मुसलमान कर्मचार्‍यांना हटवण्यात यावे, तसेच त्यांना प्रवेश देणार्‍या उत्तरदायी अधिकार्‍यांची सखोल चौकशी करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, अन्यथा राज्यभर तीव्र जनआंदोलन छेडले जाईल.

श्री. घनवट म्हणाले की…,

१. शनिशिंगणापूरसारख्या पवित्र देवस्थानात मांसाहार करणार्‍या इतर धर्मीय व्यक्तींना काम देणे, हे हिंदु समाजाची श्रद्धा आणि परंपरा यांवरील मोठा आघात आहे. सध्या देवस्थानामध्ये सुमारे ३०० मुसलमान कर्मचारी कार्यरत आहेत. त्यांना मंदिराच्या अंतर्गत कार्यरत ठेवणे, हे धार्मिक परंपरा आणि मंदिरातील सात्त्विकता यांवर प्रत्यक्ष आघात करणारे आहे.

२. या प्रकरणी महाराष्ट्र मंदिर महासंघाने देवस्थानच्या विश्‍वस्तांशी संपर्क साधून हे काम तात्काळ थांबवण्याची मागणी केली. विश्‍वस्तांनी काम थांबवण्यात आल्याचे सांगितले आहे. तरीसुद्धा ज्या अधिकार्‍यांनी हे काम दिले आणि मुसलमान कामगारांची नियुक्ती केली, त्यांच्यावर कारवाई होणे अत्यावश्यक आहे.

३. आंध्रप्रदेशातील तिरुपती बालाजी मंदिरातही अशा प्रकारची घटना घडल्यानंतर मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी केवळ हिंदु कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्याचे आदेश दिले होते. महाराष्ट्र सरकारनेही तात्काळ अशीच ठोस भूमिका घ्यावी.

४. हिंदु मंदिरात व्यक्तींचे आचरण, आहार, श्रद्धा आणि भावना या सर्व गोष्टी त्या पवित्रतेशी सुसंगत असाव्या लागतात. अशा पवित्रस्थळी त्याचे पालन न करणार्‍या इतर धर्मीय कर्मचार्‍यांची नेमणूक करणे, ही मंदिराची धार्मिक शुद्धता आणि परंपरा यांवर होणारा आघात असून शासनाने हे गांभीर्याने घ्यावे.

संपादकीय भूमिका

  • हिंदूंच्या मंदिरांच्या सरकारीकरणाचा नि ‘सेक्युलिरीकरणा’चा तोटा जाणा !
  • हिंदूंच्या श्रद्धास्थानांमध्ये धर्माचरणाची पायमल्ली करणारी कृत्ये सातत्याने घडत आहेत. शनिशिंगणापूरसारख्या पवित्र देवस्थानाच्या गाभार्‍यात मुसलमान कामगारांकडून काम करवून घेणे, गोमांस किंवा मांसाहाराचे सेवन करणार्‍यांना मंदिराच्या पवित्र चौथर्‍यावर चढू देणे, ही हिंदु धर्म आणि श्रद्धा यांची थट्टा आहे. ‘मंदिर प्रशासनाने तात्काळ उत्तरदायी अधिकार्‍यांना निलंबित करून त्यांच्यावर कारवाई करावी’, असेच भाविकांना वाटते.
  • अशी मागणी का करावी लागते ? राज्यात हिंदुत्वनिष्ठ सरकार असतांना त्याने स्वत:हून या प्रकरणी कारवाई केली पाहिजे, असेच धर्मनिष्ठ हिंदूंना वाटते !
  • मुसलमानांना हिंदूंच्या देवता आणि त्यांची मंदिरे ही ‘हराम’ आहेत. त्यांच्या लेखी देवतांचे स्थान काय आहे, हे जगजाहीर असूनही हिंदु मंदिरे त्यांना असे कसे करू देतात, हे न समजणारे आहे !