सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचा ८३ वा जन्मोत्सव आणि सनातन संस्थेच्या रौप्य महोत्सव या निमित्ताने १७ ते १९ मे या कालावधीत गोव्यातील फर्मागुडी येथील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मैदानात ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव’ पार पडला. त्याला भारतभरात मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी देण्यात आली; मात्र गोव्यातील काही प्रसारमाध्यमांनी यावर टीका करून सनातनद्वेषाचा कंड शमवून घेतला. गोव्यातील ‘द गोवन’ या इंग्रजी वृत्तपत्राने १८ मे या दिवशीच्या संपादकीयमध्ये सनातन संस्थेवर टीका केली आहे. त्याचे खंडण येथे दिले आहे.

१. गोव्यातील मुख्यमंत्री कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याने ‘द गोवन’ला पोटशूळ !
टीका : सनातन संस्थेचे संस्थापक जयंत आठवले यांच्या ८३व्या जन्मोत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या सनातन संस्थेच्या २५व्या वर्धापनदिन सोहळ्याला गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी शनिवारी उपस्थिती लावली. दोन मंत्री, उत्तर गोव्याचे खासदार तसेच राज्य भाजप अध्यक्ष यांच्यासह संपूर्ण सरकारी पदाधिकार्यांसह सावंत यांची उपस्थिती ही गोवा सरकारने तीव्र उजव्या विचारसरणीच्या संघटनेला दिलेली कदाचित् पहिली अधिकृत मान्यता आहे. एवढे कमी म्हणून कि काय प्रमोद सावंत यांनी सनातन संस्था जगभर करत असलेल्या कार्याची तोंड भरून स्तुती केली.
खंडण
१. सनातन संस्था ही अध्यात्म, समाजसाहाय्य, राष्ट्ररक्षण आणि धर्मजागृती या क्षेत्रांत काम करणारी एक आध्यात्मिक संस्था आहे, जी गेली २५ वर्षे गोव्यासह संपूर्ण भारतात कार्यरत आहे. या संस्थेने केलेली कामगिरी पाहूनच मुख्यमंत्री आणि इतर मंत्रीगण या कार्यक्रमाला उपस्थित राहिले आहेत. आपणही उगाच ‘उजव्या विचारसरणीची संस्था’ असे उगाळत बसण्यापेक्षा सनातन संस्थेचे कार्य जाणून घेण्याची तसदी घ्यावी !
२. सनातन संस्थेचे कार्य वैश्विक आहे. सनातन सांगत असलेल्या साधनेमुळे जगभरातील शेकडो लोकांचे आयुष्य उजळून निघाले आहे; मात्र सनातनद्वेषाची झापडे लावलेल्या ‘द गोवन’ला पोटशूळ उठला आहे.

२. न्यायालयापेक्षा स्वतःला श्रेष्ठ समजून सनातन संस्थेला आरोपीच्या पिंजर्यात उभे करणारा ‘द गोवन’ !
टीका : त्याचे अनुयायी आणि माजी अनुयायी यांच्यावर आरोप करण्यात आले आहेत आणि काही प्रकरणांमध्ये त्यांना हिंसाचाराच्या कृत्यांसाठी दोषी ठरवण्यात आले आहे, जे सरकारांना या संघटनेपासून अंतर राखण्यास साहाय्यभूत ठरले.
खंडण : सनातनचे अनुयायी कुठल्याच हिंसाचाराच्या कृत्यासाठी दोषी ठरलेले नाहीत. न्यायालयाने सनातनच्या अनुयायांना दोषमुक्त करतांना तपासयंत्रणांवर ताशेरे ओढले आहेत. लेखकाने न्यायालयाचे निकाल तपासून पहावे !
३. सनातनद्वेषापायी सनातन संस्थेची पाकिस्तानशी तुलना करणारे ‘द गोवन’
टीका : निःसंशयपणे या संघटनेने कोणत्याही हिंसक आक्रमणांमध्ये सहभाग नाकारला आहे आणि असा दावा केला आहे की, दोषी ठरलेले एकतर आता त्याच्याशी संबंधित नव्हते किंवा त्याच्याशी संबंधित असलेल्या सर्वांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे; पण त्यानंतरही पाकिस्तानने भारतातील कोणत्याही आतंकवादी आक्रमणाचा सहभाग नाकारला आहे. त्यामुळे प्रत्येक नकार त्याच्या स्वतःच्या वजनावर तपासला गेला पाहिजे.
खंडण : एखाद्या हिंसक कारवायांमध्ये सनातन संस्थेने तिच्यावरील आरोप फेटाळणे आणि पाकने त्याच्यावरील आतंकवादी कारवायांचे आरोप फेटाळणे यांत जमीन-आकाशाचा भेद आहे. सनातन संस्था कुठल्या हिंसक कारवायांमध्ये गुंतल्याचे कुठलेही पुरावे भारतातील कोणत्याही अन्वेषण यंत्रणांना सापडलेले नाहीत; मात्र पाकिस्तान भारतात आतंकवादी कारवाया करत असल्याचे अनेक पुरावे भारत सरकारकडे आहेत. त्यामुळे राष्ट्ररक्षण आणि धर्मजागृती करणार्या एका संस्थेची पाकिस्तानची तुलना करणे, ही ‘द गोवन’ची बौद्धिक दिवाळखोरी होय !
४. न्यायालयापेक्षा स्वतःला शहाणे समजणारे ‘द गोवन’ !
टीका : कायद्याच्या दृष्टीने सनातन संस्था बाँबस्फोट, अनेक हत्या आणि भूतकाळात घडलेल्या हिंसाचाराच्या कृत्यांसाठी काही प्रमाणात नाकारार्थीपणाचा दावा करू शकते; परंतु सार्वजनिक स्मृती टिकून आहे. पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता हे निर्दोषतेचे प्रमाणपत्र नाही. हत्येच्या प्रकरणात जर मुख्य आरोपीची निर्दोष मुक्तता झाली, तर याचा अर्थ असा नाही की हत्या झाली नाही किंवा ‘कोणीही’ हत्या केली नाही.
खंडण : मडगाव स्फोटाच्या प्रकरणात ‘अन्वेषण यंत्रणांकडून सनातनला गोवण्याचा प्रयत्न केला गेला’, असे ताशेरे ओढण्यात आले आहेत. ‘द गोवन’ याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करत आहे ! न्यायाधिशांच्या भूमिकेत वावरणार्या संपादकांचा न्यायव्यवस्थेवर विश्वास नाही, हेच यातून स्पष्ट होते ! पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता हे निर्दोषतेचे प्रमाणपत्र नाही, असे म्हणणार्यांनी ‘हिंदु आतंकवाद’ दाखवण्यासाठी सनातनवर आरोप करण्यासह साध्वी प्रज्ञासिंह, कर्नल पुरोहित यांच्यासारख्यांनाही गोवण्यामागे मुसलमानधार्जिण्यांचे षड्यंत्र होते, हे लक्षात घ्यावे.
५. गोव्याचे कोणतेही माजी मुख्यमंत्री संस्थेने आयोजित केलेल्या कार्यक्रमांना उपस्थित राहिले नाहीत किंवा मंचावर दिसलेही नाहीत. (म्हणून विद्यमान मुख्यमंत्र्यांनी उपस्थित राहू नये, असे आहे का ? एरव्ही अभिव्यक्ती स्वातंत्र्याची भाषा बोलणार्यांना हे कळत नाही का ? – संपादक)
६. गोमंतक भूमीच्या मूल्यांची पर्वा असणार्यांनी गोव्यात होणार्या संस्कृतीच्या र्हासाविषयी बोलावे !
टीका : राज्याचे मुख्यमंत्री म्हणून संस्थेने आयोजित केलेल्या कार्यक्रमात सावंत यांची उपस्थिती हा चुकीचा संकेत देतो. आपल्या धर्म, संस्कृती आणि स्थानिक धार्मिक प्रथांच्या विविधतेला महत्त्व देणार्या राज्यात अशा मूल्यांना धोका निर्माण करणार्या लोकांचे समर्थन करण्यापेक्षा अधिक अपमानास्पद काहीही असू शकत नाही.
खंडण
१. समाज आणि राष्ट्र यांच्या उन्नतीसाठी कार्यरत असलेल्या संस्थेच्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी उपस्थित रहाणे हे त्यांची समाज आणि राष्ट्र यांच्याप्रति त्यांची तळमळ दर्शवते.
२. गोमंतकभूमीच्या नीतीमूल्यांची चिंता असणार्या ‘द गोवन’ला अमली पदार्थांची तस्करी, असांस्कृतिक कार्यक्रमांमुळे मूल्यांचा होणारा र्हास, बांगलादेशी घुसखोरांची वाढती संख्या यांमुळे गोमंतकभूमीच्या मूल्यांचे होणारे अधःपतन अपमानास्पद वाटत नाही का ?
३. जुने गोवे येथील शवप्रदर्शनही वादग्रस्त आहे. काही जण त्यालाही आतंकवाद्याचा उदोउदो म्हणतात. तेथे राज्यस्तरावर सर्व व्यवस्था पुरवली जाते. याविषयी ‘द गोवन’ काही बोलेल का ? कि हे बरोबर आहे ?
सांखळी येथील पुरातन किल्ल्याच्या नूतनीकरण प्रकल्पाचे लोकार्पण
मंगेशी येथे स्व. लता मंगेशकर आणि स्व. आशा भोसले यांचे स्मारक आणि संग्रहालय उभारणार ! – पर्यटनमंत्री रोहन खंवटे
सरकारची उद्यापासून ९० दिवस वृक्षारोपण मोहीम
गोव्यातील पर्तगाळ मठात वस्त्रसंहिता कठोरतेने लागू
मराठी भाषेला गोव्याची राजभाषा का करायची ?
म्हार्दाेळ, गोवा येथे द्वितीय राज्यस्तरीय मंदिर न्यास परिषद : गोव्यातील मंदिर प्रतिनिधींचा कृतीशील होण्याचा निश्चय !