
नवी देहली – उत्तरप्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अजय राय यांनी एक खेळण्यांचे विमान दाखवले होते ज्यावर त्यांनी ‘राफेल’ लिहिले होते. त्यावर त्यांनी लिंबू-मिरची लावली होती. ‘राफेलमधून लिंबू आणि मिरची कधी काढली जाईल ? देशातील लोकांना हे जाणून घ्यायचे आहे की, ते त्याचे काम कधी करेल ?, असा प्रश्न राय यांनी विचारला होता. यावर भाजपने प्रत्युत्तर देत राय यांच्यावर टीका केली आहे.
भारतीय सैन्याला पाकिस्तानच्या वाईट नजरेपासून वाचवण्याची आवश्यकता ! – भाजप

भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते असणारे खासदार सुधांशू त्रिवेदी यांनी म्हटले की, ही कदाचित् काँग्रेसला हे ठाऊक नसेल की, भारतीय सैन्य धार्मिक शिक्षकांची भरती आणि नियुक्ती करते अन् जेव्हा ते युद्धात जातात, तेव्हा ते असेच विधी करतात. राफेलवर काढण्यात आलेल्या स्वस्तिकचा अपमान करून काँग्रेस कुणाची थट्टा करण्याचा प्रयत्न करत आहे, हे मला जाणून घ्यायचे आहे. ते सनातन धर्माची थट्टा करत आहेत का ? आज भारतीय सैन्याला पाकिस्तानच्या वाईट नजरेला घाबरण्याची आवश्यकता नाही; कारण पाकिस्तानी सैन्य भारतीय सैन्याकडे भीतीने पाहत आहे; मात्र ‘इंडी’ आघाडी आणि काँग्रेस भारतीय सैन्याकडे वाईट दृष्टीने पाहत आहेत.
संपादकीय भूमिकाहिंदूंच्या काही धार्मिक विधींवर टीका करणारी काँग्रेस अन्य धर्मियांच्या धार्मिक कृतींवर कधीही टीका करत नाही; कारण हिंदु सहिष्णु आहेत. ते ‘सर तन से जुदा’चे (शिरच्छेदाचे) फतवे काढत नाही ! |
काँग्रेसच्या हुकूमशाहीचा इतिहास आता एन्.सी.ई.आर्.टी.च्या विद्यार्थ्यांसमोर !
Ram Mandir Donation Case : श्रीराममंदिरातील दान चोरीच्या प्रकरणी अंततः गुन्हा नोंद : २ जणांना अटक
‘लव्ह जिहाद’च्या आंतरराष्ट्रीय षड्यंत्राच्या प्रकरणी १४ जणांविरुद्ध दोषारोपपत्र सादर !
पनवेल येथील ७ गायींच्या मृत्यू प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करणार ! – उदय सामंत, उद्योगमंत्री
धर्म लपवून विवाह केल्याने तो अवैध ठरला, तरी पीडितेला पोटगी मिळण्याचा अधिकार ! : Madhya Pradesh High Court
केरळ : अल्पवयीन मुलांना मारहाण करणार्या ख्रिस्ती पाद्रीविरुद्ध संतप्त नागरिक रस्त्यावर !