B Z Zameer Ahmed Khan : मोदी, शहा मला बाँब द्या, मी पाकिस्तानात आत्मघातकी आक्रमण करतो !

कर्नाटकातील काँग्रेस सरकारमधील गृहनिर्माण आणि अल्पसंख्यांक कल्याण मंत्री बी.झेड. जमीर अहमद खान यांचे विधान

अल्पसंख्यांक कल्याण मंत्री बी.झेड. जमीर अहमद खान

बेंगळुरू (कर्नाटक) – आपण सर्व भारतीय आहोत. आमचा पाकिस्तानशी काहीही संबंध नाही. पाकिस्तान नेहमीच आपला शत्रू देश राहिला आहे. मी पाकिस्तानात जाऊन लढायला सिद्ध आहे. मोदी, शहा मला एक आत्मघातकी बाँब द्या, मी तो बांधून पाकिस्तानात जाऊन आक्रमण करीन, असे विधान कर्नाटकातील काँग्रेस सरकारमधील गृहनिर्माण आणि अल्पसंख्यांक कल्याण मंत्री बी.झेड. जमीर अहमद खान यांनी एका पत्रकार परिषदेत केले आहे.

या वेळी या विधानानंतर आजूबाजूचे सर्व जण हसायला लागले. त्यावर खान म्हणाले की, मी विनोद करत नाही किंवा मजेदार पद्धतीने बोलत नाही, मी याबद्दल खूप गंभीर आहे. आतंकवादाचा सामना करण्यासाठी प्रत्येक भारतियाने एकत्र यावे.

संपादकीय भूमिका

जमीर खान यांनी पाकिस्तानमध्ये जाऊन असे काही करण्यापेक्षा आणि त्यासाठी बाँब मागण्यापेक्षा भारतातील पाकप्रेमी मुसलमानांच्या विरोधात आघाडी उघडावी अन् त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचा प्रयत्न करावा !