
‘२३.१.२०२५ या दिवशी मी भक्तीसत्संग ऐकला. त्या दिवशी भक्तीसत्संगात ‘प्रत्येक सेवा गुरुकृपा होण्यासाठी आहे’, असा भाव ठेवून प्रयत्न करायला सांगितले. मी त्या दिवशी तसाच भाव ठेवून सेवा केली.
मी नेहमीप्रमाणे संध्याकाळी दुधाला विरजण लावले आणि रात्री ते दूध शीतकपाटात ठेवले. दुसर्या दिवशी आंबिल बनवतांना सौ. कस्तूरी पट्टणशेट्टी (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के, वय ५७ वर्षे) यांना दह्यावर गुरुपादुका उमटलेल्या दिसल्या. ते पाहून आम्हाला पुष्कळ आनंद झाला. माझे मन कृतज्ञतेने भरून आले.
‘स्थिर राहून भावाच्या स्तरावर सेवा करणे’, असा संदेश गुरुदेवांनी दिला. त्याबद्दल गुरुदेवांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’
– सौ. विमल विलास गरुड, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (३०.१.२०२५)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |