Ramzan Rice Distribution : तमिळनाडूतील द्रमुक सरकार रमझानच्या काळात मशिदींना विनामूल्य तांदूळ देणार

(द्रमुक म्हणजे द्रविड मुन्नेत्र कळघम्, म्हणजेच द्रविड प्रगती संघ)

चेन्नई (तमिळनाडू) – रमझानच्या काळात मुसलमानांना मशिदींमध्ये उपवासाची पेज दिली जाते. आता तमिळनाडूतील द्रविड मुन्नेत्र कळघम् पक्षाचे सरकार यासाठी तांदूळ देणार आहे. सरकारने प्रसारित केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, उपवास करणार्‍या मुसलमानांसाठी उपवासाची पेज सिद्ध करण्यासाठी तमिळनाडू सरकार प्रतिवर्षी मशिदींना तांदूळ देणार आहे. सरकार मशिदींना ७ सहस्र ९२० मेट्रिक टन तांदूळ देणार आहे. यासाठी सरकार १८ कोटी ४१ लाख ४० सहस्र रुपये अतिरिक्त खर्च करणार असल्याचे प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. मशिदींना तांदूळ देण्याची विनंती मुसलमानांंकडून मागील वर्षांप्रमाणेच या वर्षीही करण्यात आली आहे.

संपादकीय भूमिका

द्रमुक सरकार हिंदूंच्या मंदिरांचे सरकारीकरण करून त्यांचा कोट्यवधी रुपयांचा देवनिधी अन्य कामांसाठी खर्च करत आहे. मंदिरांची डागडुजी करणे किंवा अन्य व्यवस्था सुरळीत करणे यांकडे लक्ष न देता मशिदींवर मात्र उधळपट्टी करत आहे. हे तमिळनाडूतील हिंदूंच्या लक्षात कधी येणार ?