हिंदूंनो, देव, देश आणि धर्म यांवरील सुलतानी संकट ओळखा !

‘वक्फ’च्या हिरव्या अजगराचा सिंधुदुर्गाला विळखा ?

‘वक्फ’ म्हणजे एक भस्मासुर आहे. याचा धोका जितका हिंदूंना आहे, तितकाच मुसलमानांनाही आहे. हिंदी चित्रपटात दाखवल्या जाणार्‍या अत्याचारी ठाकूर किंवा सावकारासारखा हा कायदा सामान्य मुसलमानावर दहशत राखून आहे. त्यांनी काय मत मांडावे, याविषयी त्यांचे स्वातंत्र्य हा वक्फ बोर्ड ठरवू शकतो. ‘वक्फ म्हणेल तोच धर्म आणि वक्फ देईल तेच कर्म !’ वक्फ बोर्ड जर धर्मांध मुसलमानांच्या हातात असेल, तर सामान्य मुसलमान राष्ट्रीय प्रवाहात मिसळण्याची कसली अपेक्षा करणार ? परिणामी मुसलमान दबावात आणि ‘काफिर’ हिंदू धोक्यामध्ये ! कुणाचा दबाव आता कुणी कसा झुगारायचा, हा मुसलमान समाजाचा प्रश्न आहे; पण धोका कसा टाळायचा आहे, हे हिंदु समाजाने ठरवण्याची वेळ आली आहे ! ‘एक हैं तो सेफ है’ (संघटित आहोत, तर सुरक्षित आहोत), याचा अर्थ आता कळायला लागणार आहे !

१. वक्फचा धोका आता हिंदूंच्या घरांकडेही !

हे सगळे आज पुन्हा इतक्या विस्तृतपणे सांगण्याची वेळ आली, याला कारण आहे, महाराष्ट्राचे मत्स्य आणि बंदरे विकास खात्याचे मंत्री नितेश राणे यांनी नुकतीच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वक्फ बोर्डाच्या मालमत्तेविषयीची माहिती पत्रकार परिषदेत दिली. त्यामुळे सर्वसामान्य हिंदूंची झोपच उडवली आहे. ‘सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ५० ते ६० टक्के भूमीवर वक्फ बोर्डाने स्वतःचा अधिकार सांगितला आहे’, असा दावा त्यांनी जाहीरपणे केला आहे. हाती आलेल्या माहितीनुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील किमान १५६ मालमत्तांवर वक्फ बोर्डाने त्याच्या मालकीचा दावा केला आहे. त्याहूनही महत्त्वाचे म्हणजे या दावा केलेल्या मालमत्तेमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही प्रख्यात हिंदु मंदिरेही आहेत. ‘अजूनही बेसावध राहिलो, तर कुणकेश्वर, आंगणेवाडी यांसारख्या मंदिराकडे यांच्या नजरा वळायला वेळ लागणार नाही’, अशी गर्भित चेतावणीही नितेश राणे यांनी हिंदु समाजाला दिली आहे. ‘जिथे हिंदु मंदिरे सुटली नाहीत, तिथे तुमची आमची घरे कशी सुरक्षित रहातील ?’, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे. थोडक्यात आता हा धोका नजरेपलीकडे राहिला नाही, तर तुमच्या आमच्या घरात पोचला आहे.

२. हिंदूंनी संघटित होऊन वैध मार्गाने प्रतिकार करणे आवश्यक !

नितेश राणे यांचेच एक विधान महत्त्वाचे वाटले ते, म्हणजे या देशात आणि राज्यात आज हिंदुत्वनिष्ठ सरकार आहे, त्याऐवजी महाभकास आघाडीचे सरकार असते तर….! या सगळ्यात एक लक्षात घेतले पाहिजे की, आपला देश, धर्म, देव आणि आपण स्वतः या सर्वांचे प्रश्न जगाच्या पाठीवर उरलेल्या आधारासाठीच्या एकमेव शेवटच्या, म्हणजे भारत देशात या सगळ्या-सगळ्याच्या अंतिम अस्तित्वाचा आहे !

निसर्गात, आचार-विचारात, किंबहुना रक्तातच परमेश्वराविषयी श्रद्धा घेऊन जगणार्‍या कोकणी माणसा… बघ अजून तुझ्या डोळ्यावरची झापड उडते आहे का ? बघ अजून तुझ्या मनावरचे सर्वधर्मसमभावाचे गारुड उतरते आहे का ?  डोळे उघडून बघ, तुला तुझ्या घरादाराचे, मुलाबाळांचे, पोरीबाळींचे भवितव्य कुठे सुखरूप असलेले दिसत आहे का ? हिंदू असल्याने आपण ‘काफीर’ म्हणून पुन्हा काश्मीर पद्धतीने देशातून हुसकावले जाऊ नये, असे वाटत असेल, तर हिंदूंना मैदानात उतरावे लागेल ! ‘एक झालास, तर ‘सेफ’ (सुरक्षित) होशील, अजूनही सर्वधर्मभावाच्या कैफात वावरशील, तर ‘सैफ’ (मुसलमान नाव) होशील ! हिंदूंनी धर्मकर्तव्य म्हणून वैध मार्गाने उतरावे लागेल. म्हणूनच आता नाही, तर कधीच नाही !

– श्री. अविनाश गंगाधर पराडकर, सिंधुदुर्ग.