
कोल्हापूर – राधानगरी परिसरात एका महाविद्यालयीन तरुणीवर ४ जणांनी सामूहिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे. आरोपींनी या पीडित तरुणीचे अश्लील व्हिडिओ आणि छायाचित्रे सामाजिक माध्यमांवर प्रसारित करण्याची धमकी देत, तिच्यावर गेल्या १० महिन्यांपासून वारंवार शारीरिक अत्याचार केले आहेत. या प्रकरणी मुरगूड पोलिसांनी राधानगरी येथील आदित्य शेटके, पवनगिरी पालकर, विक्रम पाटील आणि रणजित मुधोळकर या ४ संशयित आरोपींना अटक केली असून न्यायालयाने त्यांना ४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
१. राधानगरीत छायाचित्रणाचा व्यवसाय असलेला मुख्य आरोपी आदित्य शेटके याची याच व्यवसायाच्या माध्यमातून पीडित तरुणीशी ओळख झाली. पुढे त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले. याच जवळीकीचा अपलाभ घेत आदित्यने तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित करून अश्लील व्हिडिओ चित्रित करून तिला अडकवले.
२. पीडितेला ‘ब्लॅकमेल’ करत ४ जणांनी वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन तिच्यावर वारंवार बळजोरीने शारीरिक अत्याचार केले.
३. सध्या पोलीस सर्व आरोपींची चौकशी आणि पुढील सखोल अन्वेषण करत आहेत.
Gaziyabaad Shahnawaz Murders : छेडछाडीला विरोध करणार्या अल्पवयीन हिंदु मुलीला शाहनवाजने चौथ्या मजल्यावरून खाली फेकले : मुलीचा मृत्यू
धर्मांतरितांना अनुसूचित जमातीच्या सवलती द्यायच्या का ?, हे निश्चित करण्यासाठी महाराष्ट्रात समिती स्थापन !
उच्चस्तरीय चौकशी समिती नेमणार्या आयुक्त डॉ. मंजिरी मनोळकर यांचे स्थानांतर
नक्षली कारवायांमुळे उपेक्षित गडचिरोलीतील २२ ठिकाणी होणार ‘आपले सरकार सेवा केंद्रे’
पुणे विभागात ३७ लाख रुपयांचा भेसळयुक्त अन्नसाठा कह्यात
थोडक्यात महत्त्वाचे (दि : १७.०७.२०२६)