‘३.२.२०२५ (माघ शुक्ल षष्ठी) या दिवशी आधुनिक वैद्य अशोक तांबेकर यांचा वाढदिवस आहे. मी आधुनिक वैद्य अशोक तांबेकर यांच्या समवेत १० वर्षांपासून देवद येथील सनातनच्या आश्रमात सेवा करत आहे. माझ्या लक्षात आलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.
आधुनिक वैद्य अशोक तांबेकर यांना ७१ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने नमस्कार !

१. नम्र
‘तांबेकरकाकांना त्यांच्या शिक्षणाचा थोडाही अहं नाही. ते आश्रमात आल्यावर त्यांना भेटणार्या लहान-थोर सर्व साधकांना नम्रपणे हात जोडून नमस्कार करतात.
२. त्यांच्यात पुष्कळ प्रेमभाव आहे.
३. ते मनमिळाऊ आहेत. त्यांचा सर्वांना आवश्यक ते साहाय्य करण्याचा प्रयत्न असतो.

४. सेवाभाव
अ. ते स्वच्छता, तसेच अन्य कुठलीही सेवा मनापासून, परिपूर्ण आणि भावपूर्ण करतात.
आ. ते त्यांचा चिकित्सालयाचा व्याप सांभाळून उपलब्ध वेळेत सेवा करतात.
५. साधकांना आधार देणे
आम्हा साधकांना त्यांचा आधार वाटतो. आमच्या मनात त्यांच्याप्रती आदरभाव निर्माण झाला आहे.
६. भाव
ते सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांना अपेक्षित असे वागण्याचा प्रयत्न करतात.
‘हे गुरुदेवा, तुमच्या कृपाशीर्वादामुळेच मला आधुनिक वैद्य तांबेकरकाकांची गुणवैशिष्ट्ये लिहिता आली’, त्याबद्दल मी आपल्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते.’
– सुश्री (कु.) मनीषा पोशे, सनातन संकुल, देवद, पनवेल. (१९.१०.२०२४)