
साधिकेच्या मनात लादी पुसण्याचा विचार येणे, तेव्हा परात्पर गुरु डॉक्टरांनी आश्रमात येणार्या संतांना लादीवर पडलेले डाग दाखवण्यासाठी तिला लादी न पुसण्यास सांगणे : ‘वर्ष २००७ मध्ये परात्पर गुरु डॉ. आठवले देवद आश्रमात आले होते. एकदा आध्यात्मिक त्रास होत असलेल्या साधकांसाठी नामजपादी उपाय करण्यासाठी एक संत देवद आश्रमात येणार होते. मला सकाळी साडेनऊ वाजता परात्पर गुरु डॉक्टरांची खोली आवरायची होती. माझ्या मनात विचार आला, ‘संत खोलीत येण्यापूर्वी लादी पुसून घेऊया.’ त्याक्षणी परात्पर गुरु डॉक्टर म्हणाले, ‘‘आज लादी पुसू नकोस. त्या संतांना लादीवर पडलेले डाग दाखवायला हवेत ना !’’ मी ‘हो’, असे म्हणाले. त्या वेळी जर मी लादी पुसली असती, तर त्या संतांना ते डाग दाखवता आले नसते. ‘ती माझी मोठी चूक झाली असती’, हे माझ्या लक्षात आले. तेव्हा देव (परात्पर गुरु डॉ. आठवले) सर्वव्यापी, सर्वसाक्षी आणि त्रिकालज्ञानी आहेत , याची मला प्रचीती आली.’
– सुश्री (कु.) प्रतीक्षा हडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
|