सोलापूर येथील कु. संध्या कुरापाटी (वय १९ वर्षे) यांना परात्पर गुरु डॉक्टरांच्या कृपेमुळेच साधना होते आणि तेच सुखाचा ठेवा आहेत, याविषयी सुचलेले काव्य येथे दिले आहे.

तुझी कृपा म्हणजेच माझं समाधान ।
तुझ्याविना कुठे सापडेल चैतन्याचे दालन ।
तूच आहेस माझे सुखाचे निधान (टीप) ।
तुझ्या स्मरणानेच मिळतं मनाला समाधान ।। १ ।।

तुझ्या नामानेच फुलते माझी प्रार्थना ।
तुझ्या कृपेनेच होते सगळी साधना ।
देवा (परात्पर गुरु डॉ. आठवले), या जिवाचा तूच आधार ।
तुझ्याविना आयुष्य आहे सारा व्यर्थ भार ।। २ ।।
देवा, माझ्यापासून दूर जाऊ नकोस ।
तुझ्या कृपेच्या झर्याला कधी आटू देऊ नकोस ।
तुझ्याच चरणांशी मला रहाता येऊ दे ।
माझा प्रत्येक श्वास तुझ्या नामाशी जोडू दे ।। ३ ।।
टीप – निधान : ठेवा
– कु. संध्या कुरापाटी (वय १९ वर्षे), सोलापूर (१७.१.२०२५)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |