(मजार म्हणजे मुसलमानांचे थडगे)
![](https://static.sanatanprabhat.org/wp-content/uploads/sites/3/2025/01/28175050/Bareilly-Majar-Illegal.jpg)
बरेली (उत्तरप्रदेश) – बरेलीच्या गणेशपूर गावात एका मजारीवर अवैध कायमस्वरूपी बांधकाम करण्यात आले. रात्रीच्या वेळी येथे सिमेंटचे खांब टाकून २० फूट उंच इमारत बांधण्यात आली. या प्रकरणी बरेलीच्या भाजपच्या खासदाराने तक्रार केली. या तक्रारीच्या आधारे प्रशासनाने चौकशी करून आरोपी मुसलमानांना नोटीस पाठवली.
An Illegal Building was built on Mazar In Bareilly (Uttar Pradesh) : Complaint filed against 100 Mu$!ims!
What was the administration doing while an illegal construction was taking place on such a large scale? It is because of this indifferent attitude that fanatical Mu$!ims are… pic.twitter.com/EtFKW7eGso
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) January 28, 2025
१. याविषयीच्या एका वृत्तानुसार गणेशपूर गावातील एका कब्रस्तानात ३० ते ४० वर्षे जुने थडगे होते. जानेवारी २०२५ मध्ये रात्रीच्या वेळी अवैध बांधकाम करून त्यावर छप्पर घालण्यात आले. या बांधकामासाठी प्रशासनाकडून कोणतीही अनुमती घेण्यात आली नव्हती किंवा त्याला माहितीही देण्यात आली नव्हती. बरेलीचे भाजपचे खासदार छत्रपाल सिंह गंगवार या गावाजवळून जात असतांना हे संपूर्ण प्रकरण उघडकीस आले. या ठिकाणी भेट देऊन त्यांनी माहिती गोळा केली.
२. उपजिल्हाधिकार्यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले. प्रशासनाने चौकशी केली तेव्हा हे बांधकाम अवैध असल्याचे आढळून आले. यानंतर हे बांधकाम तातडीने पाडण्याचे आदेश देण्यात आले.
३. या प्रकरणी कारवाई करत पोलिसांनी गावातील १०० मुसलमानांच्या विरोधात शांतता भंग करण्याच्या कलमांखाली गुन्हा नोंदवला आहे.
संपादकीय भूमिका
|