ठाणे – अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाला मीरा-भाईंदर आणि वसई-विरार भागात बांगलादेशी नागरिक मोठ्या प्रमाणात रहात असल्याची माहिती मिळाली होती. पथकाने विविध विभागात धाडी घालून ३ बांगलादेशींना अटक केली. त्यांनी सीमेवरून भारतात घुसखोरी केली होती. त्यांच्याकडील कागदपत्रे बनावट होती. त्यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
संपादकीय भूमिकाबांगलादेशींचा सुळसुळाट झालेला महाराष्ट्र ! |