(मोबाईल टॉवर म्हणजे भ्रमणध्वनी मनोरा)
पाटलीपुत्र (बिहार) – बक्सर जिल्ह्यातील डुमरांव शहरातून चोरट्यांनी ४० मीटर उंच ‘मोबाईल टॉवर’च चोरून नेल्याचा प्रकार उघडकीस आला. या ‘टॉवर’वरील उपकरणे आणि डिझेल जनरेटर हे दोन्ही चोरट्यांनी लंपास केले.
दूरसंचार क्षेत्रातील पायाभूत सुविधा उभारणार्या आस्थापनाच्या अधिकार्यांनी नियमित पडताळणीच्या वेळी संबंधित ठिकाणी भेट दिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. अनेक वर्षांपासून वापरात नसलेला टॉवर जागेवरून पूर्णपणे गायब झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. हे पाहून अधिकार्यांना धक्का बसला. यानंतर त्यांनी डुमरांव पोलिसांकडे तक्रार केली. पोलिसांनी गुन्हा नोंदवून अन्वेषण चालू केले आहे.
Unbelievable: Entire 40-Metre Mobile Tower Stolen in Bihar!
In a shocking display of lawlessness, thieves in Dumraon (Buxar district) have dismantled and stolen a 40-metre-tall mobile tower, along with its equipment and a diesel generator.
This brazen crime follows the infamous… pic.twitter.com/O89VsZFPKt
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) June 14, 2026
हा टॉवर खासगी भूमीवर उभारण्यात आला होता. संबंधित भूमीमालकाने कंपनीसमवेतचा भाडेकरार काही वर्षांपूर्वी संपुष्टात आल्याचा दावा केला असून चोरीशी काहीही संबंध नसल्याचे स्पष्ट केले.
टोळीचा हात असल्याचा पोलिसांना संशय
तपास अधिकार्यांच्या मते, ४० मीटर उंच पोलादी टॉवर उखडून दुसरीकडे नेण्यासाठी मोठे मनुष्यबळ, अवजड यंत्रसामग्री आणि तांत्रिक कौशल्य आवश्यक असते. त्यामुळे ही चोरी एखाद्या संघटित टोळीने नियोजनपूर्वक केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. ही चोरी करण्यासाठी अनेक दिवस लागले असावेत, असा प्राथमिक अंदाज आहे. इतका मोठा टॉवर कुणाच्याही लक्षात न जाता चोरला कसा ?, हा प्रश्न स्थानिक नागरिकांसह पोलिसांनाही पडला आहे.
४ वर्षांपूर्वी ४० फूट लांबीचा लोखंडी पूल गेला होता चोरीला !
यापूर्वी वर्ष २०२२ मध्ये बिहारच्या रोहतास जिल्ह्यात तब्बल ६० फूट लांबीचा लोखंडी पूल उखडून चोरल्याची घटना घडली होती. तेव्हाही अशाच प्रकारे आश्चर्य व्यक्त करण्यात आले होते.

पुणे विभागात ३७ लाख रुपयांचा भेसळयुक्त अन्नसाठा कह्यात
दिघी (पुणे) पोलीस ठाण्यातील महिला पोलीस उपनिरीक्षकास लाच घेतांना अटक !
खासगी ॲपद्वारे घराच्या स्वच्छतेसाठी बोलावलेल्या कर्मचारी मुलीने मंगळसूत्र चोरले !
न्यायाधिशांच्या खुर्चीवर काळी जादू करणार्या महिलेला अटक
थुंकणार्याकडून आता अडीच सहस्र रुपये दंड वसूल करा ! – मुंबई उच्च न्यायालय
शिवराज मोटेगावकर याने रसायनशास्त्राची प्रश्नपत्रिका मिळवण्यासाठी दिले ५ लाख रुपये !