काहीही झाले, तरी अमेरिकेशी तह न करण्यावर ठाम

तेहरान (इराण) – इराण आणि अमेरिका यांच्यातील शांतता करार अंतिम टप्प्यात असतांना इराणमध्ये या कराराच्या विरोधात नागरिकांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केले. ‘काहीही झाले, तरी अमेरिकेशी तह करू नका’, अशी मागणी आंदोलकांनी केली असून त्यांनी परराष्ट्रमंत्री अब्बास अराघची आणि संसदेचे अध्यक्ष महंमद बागेर गालिबाफ यांच्यावर टीका केली आहे.
🚨 Protests erupt across Iran as citizens take to the streets to oppose a potential peace deal with the US. 🇮🇷 🇺🇸
Demonstrators demand no compromise with Washington, accusing leadership of granting "excessive concessions" and threatening Iran’s influence in the Strait of Hormuz.… pic.twitter.com/SKHnzJOvsK
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) June 14, 2026
इराणमधील विविध शहरांमध्ये निदर्शने केली जात असून हा करार इराणच्या हिताविरुद्ध असल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. अमेरिकेसमवेतच्या वाटाघाटींमध्ये प्रमुख भूमिका बजावणार्या अराघची आणि गालिबाफ यांच्या विरोधात घोषणाही देण्यात आल्या. तेहरानमधील इब्न सिना चौकात मोठ मोर्चा काढण्यात आला, तर मशहद शहरात परराष्ट्र मंत्रालयासमोरही नागरिकांनी आंदोलन केले. ‘फार्स न्यूज एजन्सी’ने प्रसिद्ध केलेल्या व्हिडिओमध्ये आंदोलक अराघची यांच्या विरोधात घोषणा देतांना दिसत आहेत. ‘हॉर्मुझ सामुद्रधुनीतील इराणचा प्रभाव या करारामुळे अल्प होईल’, अशी भीती आंदोलकांनी व्यक्त केली.
करारात अमेरिकेला अवाजवी सवलती दिल्याचा आरोप !
आंदोलकांच्या मते, प्रस्तावित करारामुळे अमेरिकेला अवाजवी सवलती दिल्या जात असून हा इराणसाठी लाजिरवाणा करार ठरेल. त्यामुळे अराघची आणि गालिबाफ यांनी त्यागपत्र द्यावे.
‘इंडो-पॅसिफिक’ : २१ व्या शतकातील भारताच्या सुरक्षेचा नवा महामार्ग !
अमेरिकेत ख्रिस्त्याकडून धर्म विचारून भारतीय वंशाच्या मुसलमानावर चाकूने आक्रमण
Oil purchase from Russia : रशियाकडून तेलखरेदी करणार्या भारतासह ५ देशांवर अमेरिका लादणार १०० टक्के शुल्क !
पाकव्याप्त काश्मीरमध्ये आंदोलन करणार्यांवर पाक सैन्याचा गोळीबार : १२ जण ठार, ३८ जर घायाळ
Russia Ukraine War : युक्रेनकडून रशियाच्या २० नौकांवर आक्रमण !
भारतात अवैधरित्या वास्तव्यास असलेला अमेरिकेचा माजी सैनिक कह्यात