दानपेटीतील रक्कम चोरल्याच्या आरोपाचे प्रकरण
अन्य एका कर्मचार्याचेही अन्वेषण चालू
अयोध्या (उत्तरप्रदेश) – श्रीराममंदिरातील दानपेटीतील रक्कम चोरीला गेल्याच्या आरोपाप्रकरणी विशेष अन्वेषण पथकाने मंदिरातील कर्मचारी लवकुश मिश्रा यास कह्यात घेऊन त्याचे अन्वेषण केले. या वेळी अन्वेषण यंत्रणेला मिश्रा याच्या घरी १० लाख रुपये सापडले. त्याने काही पैसे कपाटात, तर काही पैसे शेणाच्या ढिगार्याखाली लपवले होते. मिश्रा हा मंदिरात आलेल्या देणगीची मोजणी करण्याचे काम करतो. तो मीनापूरमधील फगौली गावातील रहिवासी आहे.
🚨 Scandal at Shri Ram Mandir, Ayodhya! 🚨
A temple employee was arrested after ₹10 Lakh in cash, stashed under a pile of cow dung was recovered from his home! 💸🐄
Investigations reveal shocking details:
Employee earning ₹18k/month bought properties worth ₹1.5 Crore & ₹40… https://t.co/mRZb10cUnN pic.twitter.com/BLHaiiRN9f— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) June 14, 2026
विरोधी पक्षांनी दानपेटीतील रक्कम चोरीला गेल्याचा आरोप केल्यानंतर या प्रकरणाचे विशेष अन्वेषण पथकाद्वारे अन्वेषण करण्याची मागणी श्रीराममंदिर तीर्थक्षेत्र न्यासाने मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे केली. मुख्यमंत्र्यांनी अवघ्या काही घंट्यांत पथकाची स्थापना केली आणि त्याच दिवशी मिश्रा याला कह्यात घेण्यात आले. या प्रकरणी आणखी एका कर्मचार्याचे अन्वेषण चालू असल्याचे समोर आले आहे. त्याच्याकडेही मिश्रा याच्याप्रमाणेच देणगीची रक्कम मोजण्याचे काम होते.
१८ सहस्र रुपये पगारात दीड कोट रुपयांची भूमी खरेदी !
संशयित असलेल्या दोन्ही कर्मचार्यांना प्रत्येकी प्रति मास १८ ते २० सहस्र रुपये पगार दिला जातो; परंतु अलीकडच्या काही मासांत त्यांच्या संपत्तीत अचानक वाढ झाल्याने अन्वेषण पथक या उत्पन्नाचा स्रोत शोधत आहेत. एका कर्मचार्याने जवळपास दीड कोटी रुपयांची भूमी खरेदी केली आहे, तर दुसर्याने ४० लाख रुपयांची नवीन सदनिका खरेदी केल्याचे उघड झाले.
मिश्रा याचे वडील बच्चूलाल यांनी त्यांचा मुलगा निर्दाेष असल्याचे सांगत घराच्या बांधकामासाठी वडिलोपार्जित भूमी गहाण ठेवून हे पैसे आणल्याचे सांगितले.

वसईत मिठाईच्या दुकानदाराला लुटणार्या तोतया अधिकार्यांवर गुन्हा नोंद !
हॉटेलवर कारवाई करणार्या पोलिसाचे निलंबन रहित !
स्टुडंट्स इस्लामिक संघटनेविषयी गोव्याचे शिक्षण खाते सतर्क
श्रीराममंदिर येथील विशेष पोलीस पथकाचे अन्वेषण आणि पोलीस कारवाई निर्णायक टप्प्यावर पोचेल !
प्रवाशाला लुटणार्या दोघांना सुनावली पोलीस कोठडी
‘पॉक्सो’अंतर्गत अटक केलेल्या आरोपींवर कठोर कारवाई आणि विकृत वाहकाला बडतर्फ करा !