ग्राहक आयोगाचे संपूर्ण कार्यालयाचे नूतनीकरण

रत्नागिरी, ११ जून (जिमाका) – ग्राहक आयोगाचे कामकाज पूर्णपणे ठप्प झाले आहे, हे वृत्त चुकीचे आहे. ग्राहक आयोगाचे संपूर्ण कार्यालयाचे नूतनीकरण एकाच वेळी न करता सध्या अर्ध्या भागात (कोर्ट हॉल, अध्यक्ष आणि सदस्य यांच्या कक्षात, तसेच टेरेसवर) चालू आहे. त्या कारणाने राहीलेल्या अर्ध्या भागात याचिका प्रविष्ट सुनावणी (ॲडमिशन हिअरींग), कागदपत्रे प्रविष्ट करून घेणे, नोटिसा पाठवणे इ. सर्व कामे सुरळीतपणे चालू असल्याची माहिती जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाच्या प्र. प्रबंधकांनी दिली आहे.
सद्य:स्थितीत रत्नागिरी जिल्हा आयोग कार्यालयाच्या नूतनीकरणाचे कामकाज चालू असल्याने कामकाज पूर्ण होईपर्यंत प्रविष्ट सुनावणी आणि घोषित करण्याची निकाली प्रकरणे (Admission Hearing & Pronouncement Order) वगळून दैनंदिन बोर्ड ४ मे २०२६ पासून पुढील ३ आठवडे डिस्चार्ज करण्याची अनुमती देण्यात आली होती. सदरची गोष्ट ही आयोगाच्या सूचना फलकावर लावण्यात आलेली होती. तद्नंतर २५ मे २०२६ पासून पुढील ३ आठवडे दैनंदिन बोर्ड डिस्चार्ज करण्यास अनुमती देण्यात आली आहे.
प्रत्यक्षात रत्नागिरी आयोगाचे कामकाज हे पक्षकारांची गैरसोय होणार नाही, याची व्यवस्थित दक्षता घेऊन राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोग, महाराष्ट्र मुंबई यांच्या निर्देशानुसार सुरळीतपणे चालू आहे.
ग्राहक आयोगाचे संपूर्ण कार्यालयाचे नूतनीकरण एकाच वेळी न करता सध्या अर्ध्या भागात चालू आहे. त्याकारणाने राहीलेला अर्धा भागात सर्व कामे सुरळीतपणे चालू आहेत; मात्र नूतनीकरणाच्या कामामुळे होणारा आवाज आणि त्यातून निर्माण होणार्या अडचणीमुळे अंतिम सुनावणी घेणे सध्या शक्य नसल्याने त्यावर वर नमूद कालावधीकरता मर्यादा घालण्यात आली आहे.
‘सनबर्न’ आणि प्रशासन यांवर मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवा !
चिखलतळे फाट्यावर महिंद्रा ‘एक्स्.यू.व्ही.’मधून चोरट्यांचा बैल चोरीचा प्रयत्न : ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे डाव फसला !
महाराष्ट्र सरकार कुंभार समाजाला वर्षाला ७०० ब्रास वाळू विनामूल्य देणार !
Praveen Nettaru : हिंदुत्वनिष्ठ प्रवीण नेट्टारू यांच्या हत्येचा आरोपी झाकीरला अंतरिम जामीन !
चिपळूण तालुक्यात १७ दरडग्रस्त गावे घोषित : प्रशासन यंत्रणा सतर्क
कॉर्पोरेट क्षेत्रातील षड्यंत्रांविषयी हिंदु जनजागृती समिती बिंग फोडणार !