
देहूगाव (जिल्हा पुणे) – आषाढी वारी सोहळा अवघ्या काही दिवसांवर आलेला असतांना श्रीक्षेत्र देहू येथील पवित्र इंद्रायणी नदीत शेकडो मासे मृतावस्थेत तरंगतांना आढळले. नदीच्या प्रदूषित पाण्यामुळे माशांचा मोठ्या प्रमाणावर मृत्यू झाला असून हे मृत मासे घाटावर वाहून आल्याने परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली आहे. वारीसाठी देहूत लाखो वारकरी येत असून ते याच नदीत स्नान आणि आचमन करतात. अशा पवित्र काळात नदीची झालेली ही दूरवस्था भाविकांच्या आरोग्यासाठी घातक ठरत आहे. यामुळे ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’ या संस्थेचे कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक यांनी तातडीने नदीपात्रात उतरून मृत मासे बाहेर काढून परिसराची स्वच्छता केली. (हे कार्य ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’चे कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक यांना करावे लागत असेल, तर प्रशासन नावाचा पांढरा हत्ती हवाच कशाला ? – संपादक)
शालार्थ आयडी मान्यतेसाठी अधिकार्यांना १५ दिवसांची मुदत !
२० संशयितांच्या शोधासाठी ५ पथके तैनात
मांगेली परिसरात पहिल्याच पावसात उच्च दाबाच्या वीजवाहिनीचे खांब वाकले
अवैधरित्या खतांची निर्मिती आणि विक्री करणारे यांच्यावर गुन्हा नोंद
देवस्थान इनाम निर्मूलन कायदा रहित होईपर्यंत लढा चालू ठेवावा ! – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती
दैनिक ‘सनातन प्रभात’च्या वार्ताहराच्या प्रबोधनानंतर मुगाळी (गोवा) येथील रस्त्याच्या बाजूचा कचरा हटवला