१. ‘परम दयाळू विष्णुस्वरूप गुरुमाऊली, महालक्ष्मीस्वरूप श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्या चरणी भावपूर्ण साष्टांग दंडवत करूया.
२. आपण सर्व जण नामदिंडी घेऊन नामाचा जयघोष करत अतिशय आनंदाने भूवरील वैकुंठात, म्हणजे रामनाथी आश्रमात येऊन पोचलो आहोत. आज काय बरे विशेष आहे ! आज श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांचा वाढदिवस आहे. आपण भू वैकुंठाला साष्टांग नमस्कार केलेला आहे. आपण सर्वांनी तेथील रज (धूलीकण) आपल्या मस्तकाला लावलेली आहे आणि त्यामुळे आज्ञाचक्राची शुद्धी झाली आहे.
३. रामनाथी आश्रमाकडे बघत असतांना आश्रम पुष्कळ आनंदाने हळुवारपणे डोलत असल्याचे आपण बघत आहोत. आज आश्रमातून आनंदाचे कारंजे उसळत आहेत. त्या कारंजाचे तुषार आपल्या देहावर पडल्याने आपल्याला पुष्कळ आनंद वाटत आहे.
४. आपण आता रामनाथी आश्रमाच्या सभागृहात आलेलो आहोत. त्या ठिकाणी साक्षात् गुरुमाऊली रत्नजडित सिंहासनावर विराजमान आहे. त्यांच्या बाजूच्या दोन आसंदीत श्रीसत्शक्ति बिंदामाता आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ (अंजलीमाता) विराजमान आहेत. आपण सर्व जण या तिन्ही गुरूंच्या चरणी नतमस्तक झालो आहोत. आपण सर्वांनी श्रीसत्शक्ति बिंदाताईंना नयनांच्या ज्योतीने ओवाळले आहे.
५. या वेळेला श्रीसत्शक्ति बिंदाताईंच्या भावसत्संगातील वाणीचे आपल्याला स्मरण होत आहे. श्रीसत्शक्ति बिंदाताईंविषयी कितीही बोललो, तरी ते अल्पच आहे. इतके त्यांचे गुण आहेत. गुरुकार्याची तळमळ आणि ते करवून घेण्याची क्षमता हे सर्व अलौकिकच आहे. गुरुदेवांचा प्रत्येक शब्द सत्यात उतरवण्यासाठी श्रीसत्शक्ति बिंदाताई आणि श्रीचित्शक्ति अंजलीकाकू साधकांकडून करवून घेत असलेले प्रयत्न बघून मन भावविभोर होते.
६. श्रीसत्शक्ति ताई म्हणजे साक्षात् विष्णूची गुरुवाणी आहे. त्या आता सर्व साधकांना भावाच्या टप्प्यातून भक्तीच्या टप्प्याकडे घेऊन जात आहेत. अशा या सर्वांच्या माता असलेल्या श्रीसत्शक्ति ताईंच्या चरणी आपण सर्व जण कोटी कोटी वंदन करूया. ‘हे गुरुमाऊली ! महालक्ष्मीस्वरूप श्रीसत्शक्ति बिंदाताई आणि सरस्वतीस्वरूप श्रीचित्शक्ति अंजलीताई यांच्यासारखे गुण, यांच्यासारखी भक्ती, यांच्यासारखा भाव, तळमळ आणि प्रयत्न आमच्यामध्ये अंशतः का होईना, निर्माण होऊ दे, अशी आपल्या पावन चरणी कोटी कोटी प्रार्थना आहे.
७. या अनमोल आनंदाच्या क्षणी तिन्ही सद्गुरूंनी आपल्या मस्तकावर हात ठेवून ‘तथास्तु तथास्तु तथास्तु’, असा आशीर्वाद दिला आहे.
८. तिन्ही सद्गुरूंच्या चरणी भावपुष्प अर्पण करून हा भावप्रयोग करण्याची संधी दिली; म्हणून कोटी कोटी कृतज्ञता व्यक्त करूया. हे सर्व अनमोल क्षण गुरुदेवांच्या कृपेने आणि सद्गुरु जाधवकाकांच्या कृपेने आपल्याला अनुभवायला मिळाले; म्हणून त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करून थांबू या. नमस्कार.’
– सौ. निवेदिता योगेंद्र जोशी (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय ५२ वर्षे), नंदुरबार