तेल अविव – इस्रायल आणि हिजबुल्ला यांच्यात युद्धविराम होऊन काही दिवस होत नाहीत, तोच लेबनॉनवर इस्रायलच्या विमानांनी आक्रमण केले. या आक्रमणात ११ जणांचा मृत्यू झाला. इस्रायलने शस्त्रसंधी कराराचा भंग केल्याचा आरोप करून हिजबुल्लाने इस्रायलवर आक्रमण केले होते. त्याला इस्रायलने हवाई आक्रमणाने प्रत्युत्तर दिले आहे. इस्रायल आणि हिजबुल्ला यांच्यामध्ये ८ दिवसांपूर्वी ६० दिवसांचा शस्त्रसंधी करार झाला होता. या शस्त्रसंधी कराराचे जगभरातून स्वागत झाले होते.