अजपाजप

ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज

एक डॉक्‍टर म्‍हणाले, ‘महाराज (ब्रह्मचैतन्‍य गोंदवलेकर महाराज), मी अजपाजपाचा अभ्‍यास करू का ? तो जप कसा चालतो ?’ यावर श्रीमहाराज म्‍हणाले, ‘अजपाजप करायचा नसतो, तो ‘होत’ असतो. संत अजपाजपात असतात. शरिरामध्‍ये विनासायास रक्‍त सारखे फिरते ना, तसा अजपाजप संपूर्ण शरिरभर चालतो.’

(साभार : ‘श्रीब्रह्मचैतन्‍य गोंदवलेकर महाराज यांच्‍या हृद्य आठवणी’ या पुस्‍तकातून, लेखक : ल.ग. मराठे)