लोकसंख्येविषयी चिंता व्यक्त
नागपूर – लोकसंख्या शास्त्र सांगते की, लोकसंख्यावाढीचा दर २.१ पेक्षा न्यून व्हायला नको. तसे झाल्यास तो समाज नष्ट होतो, तो समाज जगाच्या पाठीवर नसतो, त्याला कुणी नष्ट करत नाही, तर तो स्वतःहून नष्ट होतो. अनेक भाषा आणि समाज असेच नष्ट झाले आहेत. त्यामुळे जोडप्याला दोनपेक्षा अधिक म्हणजे कमीतकमी ३ अपत्ये असावीत, असे महत्त्वपूर्ण विधान करत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प.पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी लोकसंख्येविषयी चिंता व्यक्त केली आहे. नागपुरात कठाळे कुल संमेलनात ते बोलत होते.