वडापाव विक्रेत्याला जिवंत जाळल्याचे प्रकरण
मुंबई – व्यावसायिक वादातून वडापाव विक्रेत्याला जिवंत जाळल्याप्रकरणी अटकेत असलेल्या एकाला मुंबई उच्च न्यायालयाने जामीन संमत केला. खटला जलदगतीने चालवला जाणे हा आरोपीचा अधिकार आहे. खटला जलदगतीने चालवण्याचे विविध न्यायालयांनी दोन वेळा आदेश देऊनही खटल्याच्या सुनावणीत प्रगती झालेली नाही, असे ताशेरे न्यायालयाने ओढले आहेत, तसेच आरोपीची जामिनाची मागणी मान्य केली.
संपादकीय भूमिका :खटल्यास विलंब झाल्याने आरोपीला जामीन द्यावा लागू नये यासाठी उपाययोजना काढणे आवश्यक ! |