बांगलादेशातील अल्पसंख्यांकांच्या हितासाठी कार्य करणार्या संघटनांची पत्रकार परिषदेत एकमुखी मागणी !
ढाका (बांगलादेश) – बांगलादेशातील अल्पसंख्यांकांच्या अत्याचारांच्या चौकशीसाठी न्यायिक आयोग स्थापन करण्याची मागणी येथील विविध मानवाधिकार संघटनांनी केली आहे. यासंदर्भात येथे नुकतीच एक बैठक घेण्यात आली, अशी माहिती ‘बांगलादेश मायनॉरिटी वॉच’चे संस्थापक-अध्यक्ष पू. रवींद्र घोष यांनी ‘सनातन प्रभात’ला दिली. या बैठकीत अल्पसंख्यांक हिंदूंवरील अत्याचारांच्या सर्व प्रकरणांमध्ये त्यांना न्याय मिळवून देण्याची आणि पीडित कुटुंबांना हानीभरपाई देण्याची विनंती अंतरिम सरकारकडे करण्यात आली.
Read more : https://t.co/1xNGmjO1OK
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) November 14, 2024
‘ढाका रिपोर्टर्स युनिटी ऑडिटोरियम’मध्ये अल्पसंख्याकांच्या मानवाधिकारांच्या संरक्षणासाठी राजकीय एकता आवश्यक आहे’, या विषयावर या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. ‘बांगलादेश मायनॉरिटी वॉच’ आणि ‘ह्यूमन राइट्स अलायन्स’ यांचे अध्यक्ष पू. रवींद्र घोष यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. यानंतर पत्रकार परिषद घेण्यात आली.
१. या वेळी ‘मानवाधिकार आघाडी, बांगलादेश’चे निमंत्रक महबूब हक, ‘नागरिक ओकिया’चे अध्यक्ष महमुदूर रहमान मन्ना, ‘क्रांतिकारी वर्कर्स’ पक्षाचे सरचिटणीस सैफुल हक, ‘गणो फोरम’चे अध्यक्ष अधिवक्ता सुब्रत चौधरी, ‘जन एकता आंदोलना’चे मुख्य समन्वयक जोनैद साकी यांची भाषणे झाली.
२. ढाका विश्वविद्यालयाचे प्रा. रोबायेत फिरदौस, ‘नॅशनल सिटिझन कमिटी’चे केंद्रीय सदस्य आरिफुल इस्लाम अदीब, ‘रिव्हर अँड डेल्टा रिसर्च सेंटर’चे अध्यक्ष महंमद एजाज आणि अन्य यांनीही दिशादर्शन केले.
३. ‘नागोरिक एकते’चे अध्यक्ष महमुदूर रहमान मन्ना म्हणाले की, बांगलादेशातील अल्पसंख्यांकांवर होत असमायनॉरिटीलेल्या आक्रमणांचा लाभ कुणाला होत आहे ? आणि ती कशी टाळता येतील ?, हे जाणण्यासाठी कोणतीही पावले उचलली गेलेली नाहीत. तथ्ये आणि संदर्भ यांचे विश्लेषण केल्यास असे दिसून येते की, गेल्या ३ महिन्यांत केवळ धार्मिक आधारावर आक्रमणे झाली, असे नाही, तर ती राजकीय हेतूनेही प्रेरित होती.
४. सैफुल हक म्हणाले की, बांगलादेशाने समाजातील राजकीय, आर्थिक आणि सामाजिक विषमता दूर करून समतावादी लोकशाही राज्य स्थापन केले पाहिजे.
५. जोनायद साकी म्हणाले की, हिंदु समाजावरील आक्रमणे ही एक राजकीय मोहीम आहे. अवामी लीग हे करत आहे. भारतीय वृत्तपत्रांचा एक विभाग ‘बांगलादेशातील अल्पसंख्यांकांचा छळ केला जात आहे’, हे अमेरिकेला पटवून देण्याचा प्रयत्न करत आहे.
संपादकीय भूमिकाबांगलादेशातील हिंदुद्वेषी सरकारकडे अशी मागणी करून काही साध्य होणार नाही. तेथील हिंदूंच्या हितरक्षणासाठी भारत सरकारनेच कठोर पावले उचलून बांगलादेशाला तसे करण्यास भाग पाडले पाहिजे. यासाठी जागृत हिंदूंनी सरकारला कठोर पावले उचलण्यास बाध्य केले पाहिजे ! |