अज्ञानाचा अंधार पसरवणारे अज्ञानेश !

श्री. ज्ञानेश महाराव  : (सौजन्य : Max Maharashtra )

‘एक आटपाट नगरातील एका कुटुंबात मुलगा झाला. आई-वडिलांनी त्याचे नाव हौसेने ज्ञानेश्वर (श्री. ज्ञानेश रामकृष्ण महाराव) ठेवले. ‘त्यांचा मुलगा समाजात ज्ञान पसरवेल’, असे त्यांना वाटले; पण मुलाला कुसंगतीने घेरले. त्याचे आदर्श पुरोगामी, बुद्धीप्रामाण्यवादी, समाजवादी आणि औरंगजेबवादी मानणारे झाले. ‘ज्ञानियाचा राजा गुरु महाराव । म्हणतो ज्ञानदेव तुम्हा ऐसे ।।’, असा जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचा संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांची स्तुती करणारा अभंग आहे; पण ज्ञानेशाची (श्री. ज्ञानेश महाराव यांची) ‘नाव सोनुबाई आणि हाती कथिलाचा वाळा’ (नाव मोठे; पण कर्तृत्व कमी प्रतीचे), अशी गत झाली. परिणामी सध्याचा अज्ञानेश हा अज्ञानाचा दिवा अंधांच्या नगरीत अंधकार पसरवत आहे.

पू. शिवाजी वटकर

असा दिवा ‘चित्रलेखा’ मासिकाचा संपादक आणि तथाकथित पत्रकार झाला. ‘तो नावारूपाला आला’, असा त्याचा भ्रम झाला. कुसंगतीने स्वतःला श्रेष्ठ समजून तो पुढे हिंदुद्वेष्टा झाला. धर्मद्रोह्यांच्या साहाय्याने त्याने उघडपणे प्रभु श्रीराम, स्वामी समर्थ इत्यादींचे विडंबन केले. तो सूर्यावर थुंकून सूर्याचे तेज न्यून करण्याचा प्रयत्न करू लागला. त्यांनी छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव असलेल्या संघटनेच्या व्यासपिठावरून हिंदु धर्माचे अश्लाघ्य भाषेत विडंबन केले. ज्या छत्रपती संभाजी महाराजांनी हिंदु धर्मासाठी स्वतःचे प्राण त्यागले, त्यांचे नाव असलेल्या व्यासपिठावर धर्माची हानी झाली. तेव्हा तेथे अनेक कौरव आणि दुर्याेधन या वृत्तीचे लोक गप्प राहून ज्ञानेशाचे समर्थक बनले.

धर्मद्रोह केल्याचे गंभीर परिणाम

असे असले, तरी आता धर्मनिष्ठ जागृत होऊ लागले आहेत आणि ज्ञानेशाला जाब विचारत आहेत. त्यामुळे त्याला पळता भुई थोडी झाली आहे आणि तो केवळ क्षमायाचनेचे नाटक करू लागला आहे. अशा धर्मद्रोह्यांनी लक्षात घ्यावे की, कुसंगतीचे आणि धर्मद्रोह केल्याचे गंभीर परिणाम त्यांना आज ना उद्या भोगावेच लागतात ! कौरवांच्या पापाचा घडा भरल्यावर श्रीकृष्णाने त्यांचा संहार केला. त्यामुळे धर्मद्रोह्यांनी हिंदु धर्म, देवता, संत आणि राष्ट्रपुरुष यांचे कितीही विडंबन केले, तरी त्यांना हिंदु धर्माची शक्ती काय आहे ?, हे येणारा काळच सांगू शकेल.’ (२५.१०.२०२४)

– (पू.) शिवाजी वटकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल.