पराभवानंतर कमला हॅरिस यांचे पक्ष कार्यकर्त्यांना आवाहन

वॉशिंग्टन (अमेरिका) – माझ्या पराभवामुळे आपल्या सर्वांचा अपेक्षाभंग झाला. तुम्ही सर्वांनी माझ्यावर दाखवलेला विश्वास, देशावरचे तुमचे प्रेम हे सगळे पाहून माझे मन भरून आले आहे. पराभूत झाल्यानंतरही तुमच्या चेहर्यावर मला पुढील वाटचालीचा निर्धार दिसत आहे. या निवडणुका आणि त्यांचे निकाल म्हणजे शेवट नाही. आपण जोपर्यंत माघार न घेता लढत राहू तोपर्यंत उज्ज्वल अमेरिकेचे आपले वचन कायम असेच तेवत राहील, असा निर्धार कमला हॅरिस यांनी व्यक्त केला आहे. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरुद्ध पराभूत झाल्यानंतर डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार कमला हॅरिस यांनी वॉशिंग्टन डीसीमधील त्यांच्या कार्यालयात पक्ष कार्यकर्त्यांना संबोधित केले. त्या वेळी त्यांनी वरील निर्धार व्यक्त केला.
कमला हॅरिस यांनी त्यांचे समर्थक आणि त्यांच्या विजयासाठी दिवस-रात्र मेहनत करणारे असंख्य कार्यकर्ते यांचे आभार मानले.
संपादकीय : स्टार्मर यांचे काय चुकले ?
Mahrang Baloch : मानवाधिकारांच्या उल्लंघनाविरुद्ध आवाज उठवणार्या महरंग बलोच यांना पाकिस्तानकडून जन्मठेपेची शिक्षा !
US-Iran Sanctions : अमेरिकेकडून इराणवरील निर्बंधांना ६० दिवसांची सवलत
Jaish Female Terrorist : जयपूर (राजस्थान) येथे हिंदु महिला ‘जैश-ए-महंमद’च्या संपर्कात !
‘नौका पुनर्वापर’ (Ship Recycling) मध्ये भारत जगात क्रमांक १ वर !
India UAE BrahMos Deal : संयुक्त अरब अमिरात भारताकडून ‘ब्राह्मोस’ क्षेपणास्त्र विकत घेण्याविषयी करत आहे चर्चा !