आज सरदार वल्लभभाई पटेल जयंती आहे. त्या निमित्ताने…
सरदार वल्लभभाई पटेल हे नाव सर्वांनाच ठाऊक आहे; पण त्यांच्या मुलांचे नाव वगैरे कुणाला ठाऊक आहे का ? सरदार वल्लभभाई पटेल यांना केवळ एक मुलगी मनीबेन. वयाच्या १६ व्या वर्षी तिने खादी वस्त्र परिधान केले आणि १७ व्या वर्षी स्वतःचे सुवर्ण अलंकार गांधी आश्रमात जमा केले. स्वतःला गांधी आंदोलनात झोकून दिले. वर्ष १९२८ चा बारडोली सत्याग्रह, वर्ष १९३० चा मिठाचा सत्याग्रह, भारत छोडो आंदोलन या सर्वांमध्ये भाग घेतला आणि अनेक वेळा कारावास भोगला.
विवाह न करता वडिलांच्या मृत्यूपर्यंत (वर्ष १९५०) त्यांची सेवा केली. सरदार वल्लभभाई पटेल म्हणायचे, ‘Those who are in politics should not hold property and I hold none’, म्हणजे ‘जे राजकारणात आहेत, त्यांनी मालमत्ता धारण करू नये आणि माझ्याकडे काही नाही.’
सरदार पटेल गेले आणि मागे मुलीसाठी काही ठेवले नाही. वडिलांच्या आज्ञेनुसार तिने एक बॅग आणि एक पुस्तक पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याकडे दिले. ते पुस्तक म्हणजे अधिकोषाचे खाते पुस्तक (बँक पासबुक) होते आणि त्यात तब्बल ३५ लाख रुपये होते. पंडित नेहरू यांनी सर्व ताब्यात घेतले. त्यांनी तिला ‘यापुढे काय करणार ?, हे विचारले नाही. यापुढे कुठे रहाणार ?, पैसे आहेत का ?, काय साहाय्य हवे आहे का ?, मी काही करू शकतो का ?’, इत्यादी काहीही विचारले नाही. (ही आहे काँग्रेसी प्रवृत्ती ! – संपादक) मनीबेन तेथून गेल्या आणि मृत्यूपर्यंत अज्ञातवासात राहिल्या. कर्णावती (अहमदाबाद) येथील एका चुलत भावासह शेवटपर्यंत राहिल्या. इंदिरा गांधी, राजीव गांधी पंतप्रधान झाले; पण मनीबेन कधी गेल्या कळालेही नाही. एक कृतघ्न देश त्यांना विसरला.
– श्री. रवी वाघमारे, नागपूर.