सातारा, २९ ऑक्टोबर (वार्ता.) – सातारा-जावळी विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी उमेदवारी अर्ज प्रविष्ट केला. या वेळी त्यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह विराट शक्तीप्रदर्शन केले. त्यामुळे सातारा नगरीला जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. सकाळी ११ वाजता गांधी मैदान येथून मिरवणुकीद्वारे शक्तीप्रदर्शनाला प्रारंभ झाला.