श्री. अमित विजय डगवार यांना त्‍यांच्‍या वाढदिवसाच्‍या दिवशी जाणवलेली सूत्रे

‘फाल्‍गुन कृष्‍ण सप्‍तमी (१.४.२०२४) या दिवशी माझा वाढदिवस झाला. त्‍या दिवशी मला जाणवलेली सूत्रे येथे दिली आहेत.

अमित विजय डगवार

१. ‘मला वाढदिवसाच्‍या दिवशी देवपूजा करण्‍याकरता बरीच फुले मिळाली. तेव्‍हा ‘मला समष्‍टी साधक फूल बनून ते गुरुचरणी समर्पित करायचे आहे’, असा देवाने आशीर्वाद दिला’, असे मला वाटले.

२. मला सकाळपासून होत असलेल्‍या आध्‍यात्मिक त्रासांवर लगेच मात करता आली.

३. माझे मन सकारात्‍मक होते आणि मला सेवा करतांना उत्‍साह जाणवत होता.

४. मी एकाग्रतेने सेवा करू शकत होतो. त्‍यामुळे सेवेतील गती आणि उत्‍साह मला अनुभवता आला.

५. माझ्‍या मनात नकारात्‍मक विचार आल्‍यावर मला त्‍यावर लगेच मात करता आली. त्‍यामुळे त्‍याचा माझे मन आणि शरीर यांवर परिणाम झाला नाही.

६. माझ्‍या मनातील ‘स्‍व’चे विचार न्‍यून झाले होते. त्‍यामुळे मला पुष्‍कळ हलकेपणा जाणवत होता.

७. मला मित्र, साधक आणि संत यांचे प्रेम अन् आशीर्वाद लाभले. त्‍यामुुळे मला दीर्घकाळ आनंद अनुभवता आला आणि माझ्‍यातील कृतज्ञताभावात वाढ होण्‍यास साहाय्‍य झाले.

माझा वाढदिवस फाल्‍गुन कृष्‍ण सप्‍तमी या तिथीला असतो. ‘देवाच्‍या कृपेने मला या वर्षी वाढदिवसाच्‍या दिवशी ७  सूत्रे अनुभवता आली’, त्‍याबद्दल मी भगवान श्रीकृष्‍ण आणि सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍या चरणी कोटीश: कृतज्ञता व्‍यक्‍त करतो.’

– श्री. अमित विजय डगवार, फोंडा, गोवा. (२.४.२०२४)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
  • आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक